सोलापूर, 21 जानेवारी : सोलापूर हे कापड गिरण्या, सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.
काय आहे प्रयोग?
सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत आहेत.
कॅन्सरमुळं जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञानं शोधलं सेंद्रीय खत, पाहा Video
केंद्र सरकारनं सेंद्रीय खतांची निर्मिती आणि अंमलबजावणीसाठी 100 कोटी जाहीर केले आहेत. गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून जैनम चरखा आणि क्रांती या खतांचा आणि किटकनाशक फवरण्याची सेंद्रीय प्रकारातून निर्मिती केली आहे. त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
संशोधनाची किमया
माळशिरस तालुक्यातील देवरे या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी निम्या भागात म्हणजेच चार एकरमध्ये त्यांनी रासायनिक फवारणी केलेले गहू लावला. तर दुसऱ्या भागात जैनम चरखा आणि क्रांती ही फवारणी केली. समान कालावधीमध्ये लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत फवारणी केलेल्या गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहयला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही.
डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय. अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Local18, Solapur