मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कॅन्सरमुळं जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञानं शोधलं सेंद्रीय खत, सर्वांचाच होणार फायदा! Video

कॅन्सरमुळं जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञानं शोधलं सेंद्रीय खत, सर्वांचाच होणार फायदा! Video

X
Dr.

Dr. Salim Channiwala : डॉ. चेन्निवाला यांनी कुटुबांतील दोन व्यक्तींना कॅन्सरमुळं गमावलं. त्यानंतर त्यांनी हे संशोधन केलंय. त्याचा आगामी पिढीला फायदा होणार आहे.

Dr. Salim Channiwala : डॉ. चेन्निवाला यांनी कुटुबांतील दोन व्यक्तींना कॅन्सरमुळं गमावलं. त्यानंतर त्यांनी हे संशोधन केलंय. त्याचा आगामी पिढीला फायदा होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

 सोलापूर 20 जानेवारी : पिकांमध्ये रासायनिक खतांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केल्यानं जमिनीची सुपिकता कमी होत आहे. त्याचबरोबर उत्पादनामध्येही गुणवत्ता राहत नाही, ही उदाहरणं आपण पाहतो.  या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करून निर्माण झालेली खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर कॅन्सरही होऊ शकतो हे वेगवेगळ्या केस स्टडीमधून स्पष्ट झालंय. देशपातळीवर शेतीच्या प्रश्नावर उपाय शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी याबाबत एक उत्पादन शोधून काढलंय. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी त्याचा यशस्वी प्रयोग केलाय.

... ती घटना कधीही विसरता येणार नाही

मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या डॉ. चेन्निवाला यांनी कुटुबांतील दोन व्यक्तींना कॅन्सरमुळं गमावलंय. त्याचबरोबर त्यांच्या एका मित्राच्या पत्नीलाही कॅन्सर झाला होता. जगातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यावर इलाज होऊ शकला नाही. कॅन्सरमुळेच त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर मित्रानेच चेन्नीवाला यांना एक विनंती केली. डॉ. चेन्नीवाला ती घटना कधीही विसरू शकणार नाहीत. त्या विनंतीनंतर त्यांच्या आयुष्याचं ध्येय बदललं.

महिलांनो, कॅन्सरकडं दुर्लक्ष करू नका, मोफत तपासणीचा घ्या फायदा

काय होती विनंती?

'तुझ्या बुद्धीमत्तेचा वापर करुन कॅन्सरचं प्रमाण कमी होईल असं प्रॉडक्ट तयार कर' अशी विनंती त्यांच्या मित्रानं चेन्नीवाला यांना केली. आयआयटी सारख्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या चेन्नीवालांनी सर्वप्रथम या विषयावर अभ्यास करण्यास सुरूवात केली. धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन न करणाऱ्या घरातील व्यक्तींना कॅन्सर कशामुळे होतो? हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.

सायनिक खतांचा बेसुमार वापर करून बनवलेले अन्नधान्य पोटात गेल्याने कॅन्सर होतो, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी त्यावर सखोल अभ्यास करून जैनम चरखा या नाावानं सेंद्रीय खताची निर्मिती केली.

शेतकऱ्यांना जाणवला फरक

'जवळपास 4 हजार केळीच्या रोपांची मी लागवड केली त्यापैकी 2 हजार रोपांना चेन्नीवाला यांनी तयार केलेलं सेंद्रिय खत दिलं. तर उर्वरित रोपांना रासायनिक खत दिलं. त्यानंतर चार महिन्यातच मला त्याचा फरक दिसत आहे. सेंद्रिय खतांचा वापर केलेल्या केळीच्या रोपांचा बुंदा आणि पाने ही रासायनिक खतांचा वापर केलेल्या रोपांच्या तुलनेत अधिक मोठी आणि जाड दिसत आहेत.

या सेंद्रिय खतांची किंमत रासायनिक खतांच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. भविष्यात या खतांचा वापर करून मिळालेले उत्पादन हे नक्कीच जास्त असेल असे मत शेतकरी रविकांत नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Agriculture, Local18, Solapur