मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रसिद्ध डॉक्टरकडून वृद्धाला बेदम मारहाण; सोलापुरातील धक्कादायक घटनेचा VIDEO

प्रसिद्ध डॉक्टरकडून वृद्धाला बेदम मारहाण; सोलापुरातील धक्कादायक घटनेचा VIDEO

अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली.

अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली.

अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Kiran Pharate

प्रितम पंडित, प्रतिनिधी

सोलापूर 13 नोव्हेंबर : सोलापुरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. यात एका प्रतिष्ठित डॉक्टरने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. डॉक्टरांकडून झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब विचारल्याने डॉक्टरने फायबर काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली.

अंधश्रद्धेचा कहर! मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी केलं बाळाचं अपहरण, बळी द्यायला निघालेली महिला, इतक्यात...

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके असं मारहाण करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. तर विजय चौधरी असं गवंडी कामगार असलेल्या पीडित व्यक्तीचं नाव आहे. डॉक्टरांनी केलेल्या मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. डॉक्टर संदीप आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संदीप आडके यांनीही पीडित व्यक्तीविरोधात सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होता असा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या फिर्यादीवरून पीडित गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना

विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात होते. यावेळी डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटं पाणी टाकलं. विजय चौधरी यांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र डॉक्टरने चौधरी यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली, असा आरोप चौधरी यांनी केला आहे. मात्र, दोन्ही बाजूकडून तक्रार दाखल झाल्याने पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात गुंतले आहेत.

First published:

Tags: Crime news, Shocking video viral