मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अंधश्रद्धेचा कहर! मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी केलं बाळाचं अपहरण, बळी द्यायला निघालेली महिला, इतक्यात...

अंधश्रद्धेचा कहर! मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी केलं बाळाचं अपहरण, बळी द्यायला निघालेली महिला, इतक्यात...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका महिलेनं आपल्या मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी नवजात बाळाचं अपहरण केलं. या बाळाचा बळी देण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली 12 नोव्हेंबर : अंधश्रद्धेच्या अनेक अशा घटना समोर येतात, ज्या हादरवून सोडणाऱ्या असतात. दिल्लीमधून आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एका महिलेनं आपल्या मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी नवजात बाळाचं अपहरण केलं. या बाळाचा बळी देण्याच्या उद्देशाने अपहरण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली. कारवाई करत पोलिसांनी नवजात बालकही ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी पीडित महिलेनं सांगितलं की, अपहरणकर्ता महिला तिला सफदरजंग रुग्णालयात भेटली. या महिलेनं बाळाच्या आईला आपण आई-बाळ यांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या एनजीओची सदस्य असल्याचं सांगितलं.

आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना

दक्षिण पूर्व जिल्ह्यातील अमर कॉलनी पोलीस ठाण्याच्या पथकाने सुमारे 2 महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या अपहरणाच्या खळबळजनक प्रकरणाची उकल केली. कोटला मुबारकपूर येथून 24 तासांत एका महिलेला अटक केली आहे. अंधश्रद्धेपोटी हे सर्व कृत्य केल्याचं महिलेनं पोलीस चौकशीत सांगितलं.

दक्षिण पूर्व दिल्लीच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितलं, की 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता अमर कॉलनी पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की दिल्लीतील गढी गावातून एका अज्ञात महिलेने दोन महिन्यांच्या नवजात बाळाचे अपहरण केले आहे. यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने एक पथक तयार करण्यात आलं.

घरी बोलवून प्रेयसीची केली हत्या, मग गुन्हा मान्य करत कोर्टातच उचललं धक्कादायक पाऊल

आरोपी महिलेने पीडितेला मोफत औषध आणि मुलासाठी समुपदेशन करण्याचं आश्वासन दिलं होतं. मुलाची तपासणी करण्याच्या बहाण्याने ती सतत संपर्कात राहिली. 10 नोव्हेंबर रोजी आरोपी महिलेनं बाळाच्या आईला नशेचा पदार्थ देऊन बेशुद्ध केलं आणि बाळाला घेऊन पळ काढला. या माहितीवर पोलिसांनी 24 तासांच्या आत कॅमेरे आणि पाळत ठेवून बाळाला आणि आरोपी महिलेला शोधून काढलं.

First published:

Tags: Crime news, Shocking news