मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना

आईने स्वतःच्या प्रियकरासोबत लावलं पोटच्या अल्पवयीन मुलीचं लग्न, अन्.., पुण्यातील हादरवणारी घटना

पीडित मुलीच्या आईचे संबंध एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मुलीला हेच तुझे वडील आहेत असंही सांगितलं होतं. मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 12 नोव्हेंबर : आई आणि मुलांचं नातं अतिशय पवित्र आणि निस्वार्थी असतं, असं म्हटलं जातं. ही बाब अगदी खरीही आहे. मात्र, काहीवेळा अशा काही घटना समोर येतात ज्या या नात्याला काळिमा फासण्यासोबतच हादरवणाऱ्याही असतात. पुण्यातून अशीच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका आईने आपल्या प्रियकरासोबतच पोटच्या मुलीचं लग्न लावून दिलं.

घरी बोलवून प्रेयसीची केली हत्या, मग गुन्हा मान्य करत कोर्टातच उचललं धक्कादायक पाऊल

पोलिसांनी या प्रकरणाबाबतची माहिती दिली आहे. यानुसार, हे कुटुंब वडगाव शेरी भागात राहात आहे. पीडित मुलीच्या आईचे संबंध एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मुलीला हेच तुझे वडील आहेत असंही सांगितलं होतं. मात्र काही दिवसांनंतर आईनेच मुलीला त्याच व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी भाग पाडलं. तू त्याच्याशी लग्न केलं नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी तिने मुलीला दिला. इतकंच नाही तर महिलेनं पोटच्या मुलीला या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासही भाग पाडलं.

याप्रकरणात पोलिसांनी 36 वर्षीय महिला आणि तिच्या 28 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे. महिलेच्या प्रियकराने या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचारही केला. अखेर या मुलीने शाळेतील आपल्या एका मित्राला याबद्दल सांगितलं आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

शेजाऱ्याचा कुत्रा भुंकल्याने भडकला माजी कृषी अधिकारी, रागात गोळीबार केला अन्..., बीडमधील धक्कादायक घटना

पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली असून पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र, आईने पोटच्या मुलीसोबत केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Pune crime, Shocking news