जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापुरात अलर्ट! सूर्यदेवाचा प्रकोप, एप्रिलमध्येच पारा 40 च्याही वर

सोलापुरात अलर्ट! सूर्यदेवाचा प्रकोप, एप्रिलमध्येच पारा 40 च्याही वर

सोलापुरात अलर्ट! सूर्यदेवाचा प्रकोप, एप्रिलमध्येच पारा 40 च्याही वर

एप्रिल महिन्यात आता सूर्यदेवाचा प्रकोप अनुभवायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40 च्या वर गेला आहे.

  • -MIN READ Solapur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

सोलापूर : सोलापूरकरांसाठी महत्त्वाचा अलर्ट आहे. तुम्ही घराबाहेर पडताना काळजी घ्या, नाहीतर आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आधीच सोलापुरात मोठ्या प्रमाणात उष्णता असतेच त्यात ऐन एप्रिल महिन्यात आता सूर्यदेवाचा प्रकोप अनुभवायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40 च्या वर गेला आहे. मे महिन्यातील उन्हाच्या चटक्यांसारखे चटके एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लोकांच्या अंगाला बसत आहेत. सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.

मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट, यंदा पाऊस कसा राहणार?

सोलापूर शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा चाळीसजवळ पोहोचला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाईलाई होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सोलापूर शहरात दुपारी सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. रात्रीच्या वेळी सुटणारी थंडीही कमी झाली आहे. मंगळवारी सोलापूर शहरात 39.9 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर किमान तापमान हे 22.4 एवढे नोंदवण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर घामाघुम झाले आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

एप्रिलमध्येच अशी अवस्था तर मे महिन्यात काही खरं नाही, यंदाचा मे महिना नेहमीपेक्षा जास्त कठीण असेल याची चाहूल आत्ताच लागली आहे. त्यामुळे पाणी भरपूर प्या, उन्हात विनाकारण फिरू नका आणि आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात