प्रितम पंडित (सोलापूर), 16 डिसेंबर : अक्कलकोट तालुक्यातील भाजप, शिंदे गट, मनसेचे पदाधिकारी पुन्हा ठाकरे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप करत अक्कलकोटमधील पदाधिकाऱ्यांची ठाकरे सेनेत घर वापसी झाली आहे. दरम्यान मागच्या 5 महिन्यांपासून ठाकरे गटातील कित्येक नेते शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला मोठी गळती लागली होती. परंतु काही पदाधिकारी आता पुन्हा माघारी फिरत असल्याचे चित्र अक्कलकोटमध्ये दिसून आले.
सोलापुरात भाजप, शिंदे गट, मनसेतील कित्येक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात सामील झाले. शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुखांसह भाजप, मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला अक्कलकोट तालुक्यात मोठा धक्का बसला आहे. तीन महिन्यापूर्वी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत घर वापसी केली आहे. जिल्ह्यातील शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांवर जोरदार आरोप करत पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश हा सत्तेसाठी झाला आहे. येत्या सहा महिन्यात जिल्ह्यातील शिंदे सेनेतील प्रवेश केलेले पदाधिकारी ठाकरे सेनेत परततील असा विश्वास ठाकरे सेनेत प्रवेश केलेले मनोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : त्या 19 बंगल्यांची चौकशी सुरू, हिवाळी अधिवेशनात नागपूर तापणार; सरकार ठाकरेंना घेरणार!
शिंदे गटात गेलेली अनेक पदाधिकारी सत्तेसाठी गेले आहेत. शिंदे गटातील अनेक नेते स्वत:ला एकनाथ शिंदे समजत आहेत. शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना पोळी शेकून घ्यायची आहे. सर्वांचे दोन नंबरचे धंदे आहेत. असे आरोप अक्कलकोट तालुक्यातील शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केलेले मनोज पाटील यांनी केला आहे.
रत्नागिरीत ठाकरे, शिंदे गटात राजकीय शिमगा होणार
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण झाला आहे. पण आता रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रत्नागिरीत जिल्ह्यातील विविध 700 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करणार आहेत. त्याच बरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विविध विकास कामांचा आढावा दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेणार आहेत.
हे ही वाचा : 'या' समस्येवरचा उपाय नितीन गडकरींकडेही नाही; लोकसभेत व्यक्त केली खंत
यावेळी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नाव आहे. निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही नावे आहे. राजापुरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पांवरूनही समर्थक आणि विरोधकांमध्ये रणकंदण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cm eknath shinde, MNS, Shiv Sena (Political Party), Solapur, Solapur (City/Town/Village), Solapur news, Uddhav Thackeray (Politician)