सोलापूर, 21 जानेवारी : सोलापूर रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड रेल्वे स्थानका दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक मध्ये वाढ करण्यात आली आहे. या मुळे रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या या रद्द केल्या आहेत. कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी रेल्वे विभागाच्या वतीने काम हाती घेण्यात आले होते. हा मेगाब्लॉक दिनांक 3 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 पर्यंत होता. परंतु सदरचे काम पूर्ण झाले नसल्याने मेगाब्लॉक 28 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे
• यात्रा प्रारंभ दिनांक 21.01.2023 आणि 28.01.2023 रोजी गाडी क्र. 22148 साई नगर शिर्डी - दादर एक्सप्रेस रद्द.
• यात्रा प्रारंभ दिनांक 25.01.2023 आणि 28.01.2023 रोजी गाडी क्र. 12131 दादर – साई नगर शिर्डी एक्सप्रेस रद्द.
• यात्रा प्रारंभ दिनांक 26.01.2023 आणि 29.01.2023 रोजी गाडी क्र. 12132 साई नगर शिर्डी - दादर एक्सप्रेस रद्द.
• यात्रा प्रारंभ दिनांक 20.01.2023 ते 28.01.2023 रोजी गाडी क्र. 11409 दौंड - निजामाबाद डेमु रद्द.
• यात्रा प्रारंभ दिनांक 22.01.2023 ते 30.01.2023 रोजी गाडी क्र. 11410 निजामाबाद- दौंड डेमु रद्द.
(लिंक ट्रेन 01413/01414 निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही सोलापूर/ दौंड/ पुणे वरुन कुर्डूवाडी - पंढरपूर मार्गे रॅक जोडून चालवली जाईल.)
• यात्रा प्रारंभ दिनांक 26.01.2023 ते 27.01.2023 रोजी गाडी क्र. 11039 कोल्हापूर - गोंदिया एक्सप्रेस रद्द.
• यात्रा प्रारंभ दिनांक 28.01.2023 ते 29.01.2023 रोजी गाडी क्र. 11040 गोंदिया- कोल्हापूर एक्सप्रेस रद्द.
सोलापूरकरांनो, पाणी जपून वापरा! या कारणामुळं 2 दिवस पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम
दुसऱ्या मार्गावर बदल करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01. 2023 रोजी गाडी क्र. 12630 हजरत निझामूद्दीन – यशवंतपूर एक्सप्रेस ही व्हाया संत हिरदाराम, मक्सी, नागदा, रतलाम, वडोदरा जं., वसई रोड, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 26.01.2023 रोजी गाडी क्र. 12130 हावडा -पुणे एक्सप्रेस ही व्हाया नागपूर, बल्हारशाह, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणे मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 17002 सिकंदराबाद - साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही व्हाया सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणतांबा मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 12780 हजरत निझामूद्दीन - वास्को -द- गामा एक्सप्रेस ही व्हाया, मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 12628 न्यू दिल्ली- बेंगलूरू एक्सप्रेस ही व्हाया मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा,पुणे, दौंड मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 22846 हटिया- पुणे एक्सप्रेस ही व्हाया नागपूर, बल्हारशाह, काजीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणे मार्गे धावेल.
• .यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 12150 दानापुर- पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 12779 वास्को -द- गामा - हजरत निझामूद्दीन एक्सप्रेस ही व्हाया, पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, रतलाम, नागदा , संत हिरदाराम मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 20657 हुबळी - हजरत निझामूद्दीन एक्सप्रेस ही व्हाया, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 27.01.2023 रोजी गाडी क्र. 12627 बंगळूर - न्यू दिल्ली एक्सप्रेस ही व्हाया, पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, वसई रोड, वडोदरा जं., रतलाम, नागदा , मक्सी, संत हिरदाराम, मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 28.01.2023 रोजी गाडी क्र. 15030 पुणे – गोरखपुर एक्सप्रेस ही व्हाया, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक 28.01.2023 रोजी गाडी क्र. 17001 साईनगर शिर्डी- सिकंदराबाद एक्सप्रेस ही व्हाया, साईनगर शिर्डी, पुणतांबा, दौंड, वाडी, सिकंदराबाद मार्गे धावेल
• यात्रा प्रारंभ दिनांक 18.01.2023 रोजी गाडी क्र. 12221 पुणे - हावडा एक्सप्रेस ही व्हाया, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावेल.
Mega Block News : रविवारी बाहेर पडण्यापूर्वी वाचा वेळापत्रक, या मार्गावर असणार मेगा ब्लॉक!
रिशेड्यूल करण्यात आलेल्या गाड्या
• यात्रा प्रारंभ दिनांक. 23.01.2023 आणि 24.01.2023 रोजी गाडी क्र. 17001 साई नगर शिर्डी – सिकंदराबाद एक्सप्रेस साई नगर शिर्डी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 0.30 मिनिट उशिरा संध्याकाळी 05.30 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 26.01.2023 रोजी गाडी क्र. 17205 साई नगर शिर्डी – काकीनाडा एक्सप्रेस साई नगर शिर्डी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 1.40 मिनिट उशिरा संध्याकाळी 06.40 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 25.01.2023 रोजी गाडी क्र. 17207 साई नगर शिर्डी – विजयवाडा एक्सप्रेस साई नगर शिर्डी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 0.30 मिनिट उशिरा संध्याकाळी 05.30 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 28.01.2023 रोजी गाडी क्र. 11 077 पुणे – जम्मू तवी एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 6 तास उशिरा रात्री 11.20 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 28.01.2023 रोजी गाडी क्र. 12113 पुणे – नागपूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 6 तास उशिरा रात्री 11.55 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 28.01.2023 रोजी गाडी क्र. 12129 पुणे – हावडा एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 5.20 मिनिट उशिरा संध्याकाळी 06.00 वाजता सुटेल.
• यात्रा प्रारंभ दिनांक. 28.01.2023 रोजी गाडी क्र. 22893 साई नगर शिर्डी – हावडा एक्सप्रेस साई नगर शिर्डी स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे ऐवजी 3.50 मिनिट उशिरा संध्याकाळी 06.40 वाजता सुटेल.
Vande Bharat Express : मुंबईतील 'या' स्टेशनवरही थांबणार वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा नवे वेळापत्रक
संबंधित गाड्यांची वेळ प्रवाशांनी लक्षात घ्यावी आणि त्यानुसार आपला प्रवास सुनिश्चित करावा. येत्या काळात सर्व प्रवास हा वेळेवर आणि सुखकर होईल यासाठी रेल्वे विभागाने हा मेगाब्लॉक घेतल्याचे सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.