सोलापूर, 21 जानेवारी : विद्युत पारेषणच्या विविध कामासाठी वीजपुरवठा बराच वेळ खंडित राहणार असल्यामुळे व उजनी धरणावरील पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने 22 व 23 जानेवारी रोजी सोलापुरातील काही भागातील पाणीपुरवठा एक रोटेशनसाठी पुढे जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस 132 केव्ही कर्मयोगी साखर कारखाना ते 132 केव्ही इंदापूर सबस्टेशन लाईन मेन्टेनन्स तसेच इंस्युलेटर स्ट्रिंगींग कोल्ड वॉश करण्यासाठी 22 जानेवारी रोजी सकाळी 09 ते सांयकाळी 5 या कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उजनी हेड वर्क्स येथील पंप हाऊससाठी 132 केव्ही इंदापूर सबस्टेशनहून येणारी 33 केव्ही लाईन बंद राहणार आहे. शिवाय या कामामुळे उजनी हेड वर्क्स येथून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी करण्यात येणारा पाण्याचा उपसा कमी होणार आहे.
Wheat Export : सोलापूर जिल्ह्यातल्या गव्हाची देखील होऊ शकते जगभर निर्यात! पाहा Video
22 व 23 जानेवारी रोजी काही भागातील पाणीपुरवठा एक रोटेशनसाठी पुढे जाणार आहे. काही भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार आहे. नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.
दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्काडा नियंत्रण प्रणालीअंतर्गत महापालिकेकडून विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. बरोबर याच दिवशी एक महिना आधी म्हणजेच 22 आणि 23 डिसेंबर 2022 रोजी सुद्धा पाणी पुरवठा बंद होता. तेव्हा सुमारे तीन दिवसानंतर रोटेशन सुरू झाले आणि पाणी पुरवठा सुरू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Solapur, Watersupply पाणीपुरवठा