जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pandharpur Student : अवघ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत पेपर लिहताना घडलं धक्कादायक, पंढरपूरमधील घटनेने खळबळ

Pandharpur Student : अवघ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत पेपर लिहताना घडलं धक्कादायक, पंढरपूरमधील घटनेने खळबळ

Pandharpur Student : अवघ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत पेपर लिहताना घडलं धक्कादायक, पंढरपूरमधील घटनेने खळबळ

पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरच्या अरिहंत स्कूलमधील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे.

  • -MIN READ Pandharpur,Solapur,Maharashtra
  • Last Updated :

पंढरपूर, 19 जानेवारी : पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरच्या अरिहंत स्कूलमधील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे. इयत्ता तिसरीमधील अनन्या भादुले (वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत हो.ती यावेळी अचानक झटका आल्याने जागीच गतप्राण झाली आहे. दरम्यान तिला असे अचानक काय झाले न समजल्याने वर्गात काही काळ भितीचे वातावरण पसरले होते. शिक्षकांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले परंतु तीचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले.

जाहिरात

इयत्ता तिसरी मधील अनन्या भादुले (वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत होती यावेळी अचानक झटका आल्याने जागीच गतप्राण झाली. घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी हलविले मात्र उपचार सूरु होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार अनन्याला ब्रेन हैम्रेज झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी हलविले मात्र उपचार सूरु होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार अनन्याला ब्रेन हैम्रेज झाले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा :  धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, VIDEO

पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूल मधील ही दुर्दैवी घटना आहे. आज गुरुवार दि. 19 जानेवारी रोजी अनन्या सकाळी 8 वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत आली. आज मराठीचा पेपर होता अनन्याने संपूर्ण पेपर सोडविला. पेपर सुटण्यास काही वेळांचा अवधी असताना अनन्या ला झटका आला. तिने हातपाय वाकडे केले.

जाहिरात

हे ही वाचा -  बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट

तिची अवस्था पाहून शिक्षकांनी तिला उचलून उपचारासाठी हलविले मात्र उपयोग झाला नाही. अधिक माहितीनुसार अनन्या ची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून ठीक नव्हती तिला ताप येत होता असे समजते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात