मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट

बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट

आत्महत्या केलेली तरुणी युक्ती सुशिल बुजाडे

आत्महत्या केलेली तरुणी युक्ती सुशिल बुजाडे

युक्ती ही सोमवारी नेहमीप्रमाणे ती दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वर्गात उपस्थित होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Khushalkant Dusane

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 19 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या तसेच आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मैत्रीण खोलीबाहेर जाताच या तरुणीने गळफास घेत आपले जीवन संपविले.

काय आहे संपूर्ण बातमी -

राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पाचव्या वर्षातील एका विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये हा प्रकार समोर आला. युक्ती सुशिल बुजाडे, असे आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. ती मुळची चंद्रपूर येथील होती.

सोमवारी नेहमीप्रमाणे ती दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वर्गात उपस्थित होती. त्यानंतर होस्टेलमध्ये गेली. दुपारी तीन वाजता वारंवार आवाज देऊनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे अन्य मुलींना संशय आला. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवल्यानंतर तिच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा अभ्यासाच्या टेबलवर उभा राहून लटकलेल्या अवस्थेत युक्ती आढळली. यानंतर तिला बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

13 जानेवारीलाच वाढदिवस केला साजरा -

मागच्या आठवड्यात 13 जानेवारीलाच युक्तीने आपला 24वा वाढदिवस साजरा केला. रविवारी संक्रांतीच्या दिवशी ती मैत्रिणींसोबत पतंग उडवण्यात सहभागी झाली होती. त्यानंतर आईशी फोनवर बोलली. सोमवारी मात्र ती बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलत होती. काही वेळा त्या संभाषणात आवाज वाढल्याचेही मैत्रिणींनी ऐकले. मात्र, बोलणे झाल्यानंतर तिने हॉस्टेलमधील आपल्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - इंजीनिअर झाली, नोकरी मिळाल्यावर टाळायला लागली गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडने घेतली मौलानाची मदत, घडलं भयानक

उच्चभ्रू कुटुंबातील युक्ती ही अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचे वडील नागपूरच्या आयटीआय विभागाचे सहायक संचालक आहेत आणि तिचे काका दमन पोलीस विभागात उच्च पदावर आहेत. तर भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. तिचे दोन्ही आयफोन पोलिसांनी जप्त केले असून तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. तिने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Aurangabad News, Crime news