दीपक बोरसे, प्रतिनिधी धुळे, 19 जानेवारी : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरल्यानंतर दुर्दैवी घटना घडली. विजेच्या खांबात विद्युत प्रवाह असल्याने त्याचा क्षणभरात मृत्यू झाला. या घटनेने शहर हादरलं आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - धुळे शहरात एक दुर्दैवी घटना घडली. दहा वर्षे मुलाचा विजेच्या खांबाला चिटकून मृत्यू झाला आहे. अर्शद अहमद अशपाक मोमीन असे मृत्यू झालेल्या या दहा वर्षाच्या मुलाचे नाव आहे. विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने अर्शदचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, VIDEO pic.twitter.com/gbNu6q3uIM
— News18Lokmat (@News18lokmat) January 19, 2023
स्थानिकांनी केला हा आरोप - दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी महावितरणवर रोष व्यक्त केला आहे. 10 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रार करूनही समस्येचे निराकरण न केल्याने अर्शदाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेने शहर हादरलं आहे. हेही वाचा - बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट पंतग उडवताना तोल गेला अन् घडलं भयानक, जळगावातील घटना - धरणगाव तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा 15 जानेवारीला पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे एक दुर्घटना घडली. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला.