मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऑनलाइन खरेदी टाळा, आम्हाला संधी द्या, 'या' गावातील दुकानदारांची मोहीम, Video

ऑनलाइन खरेदी टाळा, आम्हाला संधी द्या, 'या' गावातील दुकानदारांची मोहीम, Video

X
Solapur

Solapur : सोलापूर मधील दुकानदारांकडून ऑनलाइन खरेदी टाळा, स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्या, असे आवाहन ग्राहकांना करण्यात येत आहे.

Solapur : सोलापूर मधील दुकानदारांकडून ऑनलाइन खरेदी टाळा, स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्या, असे आवाहन ग्राहकांना करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

    सोलापूर,12 ऑक्टोबर : सध्या ऑनलाईन शॉपिंगचे क्रेझ वाढत चालले आहे. ग्राहकांना कोणतीही वस्तू सहजासहजी ऑनलाईन ॲपद्वारे खरेदी करता येत आहे. परंतु मागील काही वर्षात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ग्राहक आता विचारपूस करूनच वस्तू खरेदी करत आहे. परंतु, तरुण असणारे ग्राहक हे अजूनही ऑनलाइन शॉपिंग कडेच आपला कल वळवत आहेत. त्यामुळे याचा फटका सोलापूर मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल दुकानदारांना बसत आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी टाळा, स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्या, असे आवाहन दुकानदारांकडून ग्राहकांना करण्यात येत आहे.

    इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल या वस्तू खरेदी करण्यासाठीची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ ही सोलापुरात आहे. परंतु, गेल्या काही वर्षात कोरोना महामारीमुळे तसेच ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंग केल्यामुळे या बाजारपेठातील दुकानदारांना 40 टक्के नुकसान दरवर्षी सहन करावे लागत आहे. यामुळे दिवाळी आधी ऑनलाइन खरेदी टाळा, स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्या असे आवाहन करण्यात येत आहे.

    हेही वाचा :  टेन्शन संपलं! एका क्लिकवर मिळतील मुलांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर, Video

    असे करण्यात येत आहे आवाहन 

    अति घाईच्या वेळी रात्री अपरात्री दुकान उघडून तुम्हाला मदत करणारा, आपल्या सुख दुःखात सहभागी होणारा, वेळेला मदतीला धावून येणारा तसेच कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या वेळी ऑनलाइन सेवा बंद असताना आपल्या जीवाची परवा न करता सर्वांना सेवा देणारा हा आपला स्थानिक दुकानदारच होता. त्यामुळे व्होकल फॉर  लोकल हा नारा प्रत्येक ग्राहकांनी लक्षात ठेवावा.

    ऑनलाईन किंमती मध्येच वस्तू उपलब्ध करून देणार

    गेल्या चार वर्षापासून जीएसटी तसेच कोरोना महामारीमुळे आम्हाला कमी मार्जिनमध्ये मोबाईल विक्री करावे लागत आहेत. तसेच या ऑनलाईन शॉपिंग मुळे सोलापूर शहरात असणाऱ्या जवळपास 100 मोबाईल आणि इलेक्ट्रिक दुकानांना दरवर्षी 40 टक्के प्रमाणे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बाजारपेठा खुल्या झाल्या असल्याने ग्राहकांचा ओढा आमच्याकडे वाढावा यासाठी आम्ही ऑनलाईन खरेदीच्या असणाऱ्या किंमती त्याच किंमतीमध्ये आमच्याकडे वस्तू उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन वस्तू खरेदी न करता स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्यावे, असे सोलापूर मोबाईल रिटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल वनारसे यांनी सांगितले.

    हेही वाचा : पुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल! पाहा Video

    सेवेची शाश्वती फक्त ऑफलाईन खरेदी मध्येच 

    गेल्या 30 वर्षांपासून मी मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्यक्ष दुकानातच जाऊन खरेदी करत आहे. तसेच सेवेची शाश्वती फक्त ऑफलाईन खरेदी मध्येच मिळते असा विश्वास माझा आहे, असं ग्राहक मोहन चव्हाण यांनी सांगितले.

    First published:
    top videos

      Tags: Diwali, Online shopping, Solapur