जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल! पाहा Video

पुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल! पाहा Video

पुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल! पाहा Video

Pune : पुण्यातील शशिकांत डेअरीचा मठ्ठा हा प्रसिद्ध असून आपल्या क्वालिटीची परंपरा गेल्या 30 वर्षापासून या डेअरीने जपली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

loपुणे 10 ऑक्टोबर : पुण्यामध्ये आपल्याला विविध चौकांमध्ये अनेक डेअरी दिसतात. प्रत्येक डेअरीमध्ये दूध, ताक, लस्सी आणि मठ्ठा असे विविध दुग्धजन्य पदार्थ मिळतात. मात्र, फार कमी आणि क्वचित अशा डेअरी असतात की ज्या एखाद्या दुग्धजन्य पदार्थासाठी खुपच प्रसिद्ध असतात. पुण्यातील अशीच एक सुप्रसिद्ध रास्तापेठमध्ये शशिकांत डेअरी असून या ठिकाणचा मठ्ठा हा प्रसिद्ध आहे. चला तर या डेअरीची सुरुवात कधी झाली? हा मठ्ठा का आहे प्रसिद्ध जाणून घेऊया. पुण्यातील शशिकांत दूध डेअरीची सुरुवात 1992 साली शशिकांत जगताप यांनी केली आणि अल्पावधीतच ही दूध डेअरी सुप्रसिद्ध झाली. सुरुवात झाल्यापासून ह्या दूध डेअरीने आतापर्यंत आपली क्वालिटी खूप उत्कृष्टपणे जपली आहे. “मी ज्यावेळेस ही दुध डेअरी सुरू केली तेव्हापासून कोणत्याही प्रकारच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये उणिवा राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. यामुळे आमची दूध डेअरी आणि त्यातील दुग्धजन्य पदार्थ सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणून गणले जातात. आमच्या दूध डेअरी मधील सर्व पदार्थ अतिशय ताजे असतात. दिवसाला आम्हाला शंभर किलो दही विविध पदार्थ बनवण्यासाठी लागते आणि याच दह्यापासून आम्ही ताक, मठ्ठा, लस्सी असे पदार्थ बनवतो. यातून दिवसाला आमचे तीनशे ते चारशे ग्लास रोजच्या रोज विकले जातात. उन्हाळ्यामध्ये तर हजारोच्यावर ग्लासची आमच्या या दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते” असं डेअरी मालक शशिकांत जगताप सांगतात. हेही वाचा :  हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video पुण्यात सुरुवातीच्या काळामध्ये मठ्ठा विक्रीला सुरुवात पुण्यामध्ये फार कमी ठिकाणी मिळणारा मठ्ठा हा आमच्या इथे मिळतो. असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. पुण्यात सुरुवातीच्या काळामध्ये मठ्ठा विक्रीला आम्ही सुरुवात केली. साखर, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि थोडसं मीठाचे सुयोग्य प्रमाण असल्यामुळे आमचा मठ्ठा हा चवीला अतिशय चांगला लागतो. तो जास्त पातळही नसतो आणि जास्त घट्टही नसतो. यामुळे आमच्या मठ्ठयाला लोकांकडून विशेष मागणी आहे, असंही  शशिकांत जगताप सांगतात.

उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो मठ्ठा  घेण्यासाठी नेहमीच गिऱ्हाईकांची रांग शशिकांत डेअरीवर असते. या मठ्ठयाची किंमत 20 रुपये आहे. “आम्ही 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ घेण्यासाठी येतो या ठिकाणाचा मठ्ठा खूप छान आहे”, असं ग्राहक सांगतात. हेही वाचा :  Pune: न बोलताच मिळेल ऑर्डर! पुण्यातील ‘या’ हॉटेलमध्ये चालते सांकेतिक भाषा, VIDEO डेअरी वेळ  डेअरी ही सोमवार ते शनिवार : स.6 ते रात्री 10. रविवारी : स. 6 ते दुपारी 2. सायं. 6 ते 10 अशी उघडी असते. गुगल मॅपवरून साभार डेअरी पत्ता 

शशिकांत डेअरी 464, पॉवर हाऊस जवळ, 460/61, जवाहरलाल नेहरू रोड, पोरवाल मेटालिका, रास्ता पेठ, पुणे, महाराष्ट्र 411011

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात