औरंगाबाद, 12 ऑक्टोबर : शून्य ते आठ वयोगटातील लहान मुलांसाठी आहार, आरोग्य आणि शिक्षण आधीबाबत पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. बदलत्या कौटुंबिक पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक घरात नसल्यामुळे लहान मुलांच्या प्रश्नाचे उत्तर लवकर मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील तरुणांनी बेबी क्लाऊड हे अॅप सुरु केले आहे. या अॅप मधून लहान मुलासंबंधी पालकांचे प्रश्न सहजपणे सोडवण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मानवाची जीवनपद्धती बदलली आहे. अनेकांना नोकरीच्या निमित्ताने घर सोडून इतर ठिकाणी राहावे लागत आहे. अशावेळी अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक असतीलच असं नाही बहुतांश कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक नसतात. अशा परिस्थितीत शून्य ते आठ वयोगटातील लहान मुलांच्या आहार, आरोग्य आणि शिक्षण इत्यादींबद्दल प्रश्न पडतात. मात्र, अनुभव आणि घरात जेष्ठ नागरिक नसल्यामुळे हे प्रश्न सोडवताना त्यांना अनेक अडचणी येतात. हेही वाचा : Success Story : लाकडातून साकारल्या भन्नाट कलाकृती, विदेशातही होतेय दमदार विक्री, Video ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील आभा काबरा, आनंद मिश्रा, संकल्प पहाडे, चंदन मौर्य या तरुणांनी एकत्र येत बेबी क्लाऊड हे अॅप सुरु केले आहे. यासाठी त्यांनी ‘अद्वैता एज्युकेअर प्रा. लि.’ कंपनीची स्थापना केली आहे. ज्यामध्ये लहान मुलांच्या बौद्धिक शारीरिक शैक्षणिक तज्ञांचे टीम तयार करण्यात आली आहे. ज्यांच्या माध्यमातून पालकांना पडलेले प्रश्न थेट तज्ञांची उत्तर मिळतात. यामुळे पालकांना ह्या ॲप्लिकेशनचा फायदा होत आहे. अॅपचे फायदे उच्चशिक्षित तरुणांनी तयार केलेल्या ॲपमध्ये आई वडील यांच्यासाठी मुलांबद्दल माहिती त्यासोबतच रेसिपी, झोपण्याचं गाणं, तसेच मुलांचे लसीकरणाची वेळ आणि मुलांची ग्रोथ, मुलांना कोणत्या ट्रॅकने जायचं आहे? त्यासाठी काय केले पाहिजे इत्यादी संबंधात या ॲपमध्ये टूल्स देण्यात आले आहेत. तसेच मुलांच्या तब्येती संदर्भात फाईल देखील सेव करता येतात. मुलांचे फोटोज व्हिडिओज देखील या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही सेंड करू शकता. ज्यामुळे लहान मुलांबाबतचे चांगले वाईट व्हिडिओ एक दुसऱ्यांना लक्षात येतात. हेही वाचा : Nashik : नाशिकची लेक जगात भारी! 14 व्या वर्षीच मिळवली 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट, Video प्ले स्टोअरवर उपलब्ध ज्यांना लहान मुलांसाठी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचा आहे. त्यांना गुगलच्या प्ले स्टोअर वरती बेबी क्लाउड अॅप नाव टाईप केल्यानंतर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी कुठलाही चार्जेस लावला जाणार नाही हे ॲप्लिकेशन फ्री वापरता येणार आहे. मुलांच्या प्रश्नाची उत्तरं थेट तज्ञांकडून मिळणार मुलांच्या आरोग्य शिक्षण आणि भविष्याची वाटचाल करायचं नियोजन अनेक पालक करत असतात. मात्र, त्यांना याबाबत मार्गदर्शन मिळत नाही. यासाठी आम्ही हे बेबी क्लाउड अॅप तयार केलं आहे. मोफत असलेलं हे ॲप पालकांना सहज वापरून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं थेट तज्ञांकडून मिळणार आहे, अशी माहिती बेबी क्लाउड अॅप संचालिका आभा काबरा यांनी दिली आहे .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.