सोलापूर,दि. 12 डिसेंबर : पंढरपूर आणि शिर्डी या दोन्ही देवस्थानांचे दर्शन एकत्रितपणे घेणे आता सोपे होणार आहे. दक्षिण रेल्वेनं भारत गौरव ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान ही विशेष रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचा मोठा फायदा सोलापूरकरांना धार्मिक पर्यटनासाठी होणार आहे.
काय आहे वेळापत्रक?
मदुराई रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे 24 डिसेंबर रोजी शनिवारी रात्री 2.30 ला सुटेल . वाडी रेल्वे स्थानकावर २५ डिसेंबर रोजी रात्री 12.30 वाजता पोहोचेल आणि 12.35 ला निघेल. सोलापुर रेल्वे स्थानकावर 3.35 वाजता पोहोचेल आणि 3.40 वाजता निघेल. त्यानंतर कुर्डूवाडीमार्गे ही रेल्वे संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी पंढरपूरला जाईल. पंढरपूरमध्ये श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना वेळ मिळावा म्हणून 25 डिसेंबरचा संपूर्ण दिवस पंढरपूरमध्ये हॉल्ट असेल.
ट्रेन तिकीट असं करा कॅन्सल, बुलेटच्या स्पीडनं मिळेल रिफंड
पंढरपूरनंतर पुन्हा कुर्डूवाडी आणि दौंडमार्गे शिर्डीमध्ये 26 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ही रेल्वे पोहचेल. भाविकांना शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेता यावे तसंच इतर देवस्थानं पाहण्यासाठी त्या दिवशी शिर्डीमध्ये हॉल्ट असेल. मंगळवारी 27 डिसेंबर रोजी ही गाडी दौंड-सोलापूरमार्गे मदुराराईच्या दिशेनं निघेल. 28 डिसेंबर रोजी बुधवारी 12.35 मिनिटांनी मदुराईमध्ये पोहचेल.
कसे करणार बुकिंग?
या गौरव यात्रेसाठी रेल्वे विभागाच्या https://www.irctc.co.in/nget/train-search या साईटवरुन बुकिंग करावी लागणार आहे. अशी माहिती सोलापूर रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा असण्याचं कारण माहिती आहे का?
गौरव यात्रेच्या डब्यांची रचना
2 ब्रेक वॅन, 4 तृतीय श्रेणी वातानुकूलित , 6 स्लीपर कोच , 2 पेन्ट्री कार एकूण 14 ICF प्रकारचे डबे असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Local18, Pandharpur, Shirdi, Solapur