मुंबई, 6 डिसेंबर: प्रत्येकाला काहीना काही कारणानं प्रवास करावा लागतो. तसं पाहिलं तर आजच्या काळात प्रवासासाठी कार, दुचाकी, बस, रेल्वे, विमान अशी अनेक साधनं उपलब्ध आहेत. आपला प्रवास स्वस्त, आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी लोक प्रयत्नशील असतात. यासाठीच लोकांची पहिली पसंती असते, ती रेल्वे प्रवासाला. आरामदायी प्रवासासोबतच परवडणाऱ्या किंमतींमुळं देशातील लाखो लोक दररोज ट्रेननं प्रवास करतात. रेल्वेनं प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेचं तिकीट आधी ऑनलाइन किंवा ऑफलाइन बुक करतात. आणि त्यानंतरच ते ट्रेननं प्रवास करतात. परंतु बऱ्याचदा लोक रेल्वे तिकीट बुक करतात, मात्र विविध अडचणींमुळं त्यांना प्रवास करता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांचं कन्फर्म तिकीटही रद्द करावं लागतं. परंतु तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना एक समस्या अनेकदा भेडसावते. ही समस्या म्हणजे रिफंडची रक्कम. तिकीट रद्द केल्यानंतर तुम्हालाही रिफंड लवकर मिळावा असं वाटत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग, रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर जलद गतीनं रिफंड कसा मिळवायचा, याबद्दल जाणून घेऊया. तिकीट रिफंड लवकरात लवकर मिळण्याचा मार्ग - जर तुम्ही कोठेतरी जाण्यासाठी कन्फर्म ट्रेन तिकीट बुक केलं असेल आणि तुम्हाला ते काही कारणास्तव रद्द करावं लागलं असेल, तर IRCTC नुसार i-pa द्वारे तुम्हाला कॅन्सल केलेल्या तिकिटाचा परतावा मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. यासोबतच येथून रेल्वेचं तिकीटही लवकर बुक करता येतं. हेही वाचा: Investment Tips: पैसाच पैसा! ‘या’ बँकेनं आणली जबरदस्त स्कीम; गुंतवणूक करा, व्हाल मालामाल जलद रिफंड मिळण्याची प्रक्रिया – जर तुम्हाला लवकर परतावा मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं, डेबिट कार्ड किंवा UPI तपशील आय-पे गेटवेमध्ये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही येथून ट्रेनचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला पुन्हा येथे कोणतीही पेमेंट माहिती देण्याची गरज नाही. कमी वेळेची गरज- आता तुमच्या बँक खात्याचे तपशील आय-पे गेटवेवर उपलब्ध असल्यानं, तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट रद्द केल्यावर, तुमच्या रिफंडची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. इतर पद्धतींच्या तुलनेत इथून रिफंड मिळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हे लक्षात ठेवा- ट्रेनचं तिकीट रद्द करताना, तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की जेव्हा ट्रेनची चाट तयार असेल, त्यानंतर तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. त्यामुळे नेहमी चाट तयार होण्यापूर्वी रेल्वे तिकीट रद्द करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.