मुंबई, 5 डिसेंबर : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं असलेली यंत्रणा आहे. देशात कुठंही जाण्याचं सर्वांत स्वस्त आणि वेगवान साधन म्हणूनही रेल्वेची ओळख आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्हीही कधी ना कधी रेल्वेनं प्रवास केला असेलच. या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा पाहिला असेल. प्लॅटफॉर्मवर हा पिवळा पट्टा का असतो? हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचं उत्तर जर ‘नाही’ असेल, तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटलं जातं. देशभरातील लाखो लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे विभागदेखील सर्व सुरक्षेच्या उपायांचं पालन करतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारचे संकेतही वापरले जातात. या मधीलच एक संकेत म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणारा पिवळा पट्टा. काही ठिकाणी प्लॅटफॉर्मवर हा पिवळा पट्टा पिवळ्या रंगाचा तर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा पट्टा पिवळ्या रंगाच्या टाईल्सचा बनवला जातो. चला तर, हा पट्टा नेमका का बनवतात, हे आपण जाणून घेऊया.
पिवळा पट्टा असतो, कारण… रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा बनवला जातो, कारण जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचणार असते, तेव्हा लोक ट्रेनमध्ये चढण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ पोहोचतात. पण ट्रेन जेव्हा प्लॅटफॉर्मवर येत असते, तेव्हा प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या पिवळ्या पट्टीच्या मागेच उभं राहणं आवश्यक असतं. मुळात याच उद्देशानं हा पिवळा पट्टा प्लॅटफॉर्मवर बनवला जातो. कारण जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचते, तेव्हा जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे ती इतरांना स्वतःकडे खेचत असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनचा धक्का लागू नये, म्हणून पिवळा पट्टा बनवला जातो. गाडी अनियंत्रित होताच ड्रायव्हरने घेतली उडी; 1 KM चालकाशिवायच महामार्गावर धावत राहिला कंटेनर अन्.. तसंच हा पिवळी पट्टी पृष्ठभागावरून थोडासा वर आलेला असतो, जेणेकरून कोणीही दृष्टिहीन व्यक्ती प्लॅटफॉर्मवर असेल, तर तो ट्रेनकडे जात असताना रेल्वे रुळावर पडू नये. हा वर आलेला पिवळा पट्टा दृष्टिहीन लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा बनवण्यामागचा उद्देश हा प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे प्रवाशांनीदेखील ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असताना या पिवळ्या पट्ट्याच्या मागे थांबणं गरजेचं आहे.

)







