Home /News /maharashtra /

बिबट्याचे कान धरले आणि खाली आपटलं, सुट्टीसाठी शेतमजुराने रंगवली कथा अन्....

बिबट्याचे कान धरले आणि खाली आपटलं, सुट्टीसाठी शेतमजुराने रंगवली कथा अन्....

शेतमजूर भारत गवळी यांनी आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा घटनाक्रम वनअधिकाऱ्यांना सांगितला आणि त्याने बनाव रचल्याचे उघड झाले.

सोलापूर, 31 जुलै : सोलापूर (solapur) शहरालगत असलेल्या कोंडी आणि अकोलेकाटी गावात बिबट्या (leopard) दिसल्याची चर्चा गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे. आज तर चक्क एका शेत मजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातच एका वाघाला काही गावकरी पिटाळून लावत असल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. मात्र, ही सर्व घटना म्हणजे, एक बनाव असून हल्ला झालेला शेतमजुराचा बनाव देखील उघड झाला आहे. त्याचबरोबर संबंधित व्हायरल झालेला हा व्हिडीओदेखील सोलापुरातील नसल्याचे आता समोर आले आहे.  त्यामुळे सुरवातील गंभीर वाटणाऱ्या या घटनेने गमतीशीर वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंडी आणि अकोलेकाटी गावात मागील आठ दिवसापासून बिबट्या असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरलेला पाहायला मिळत आहे. त्यातच आज दुपारच्या सुमारास अकोलेकाटी येथील एका शेतात काम करणाऱ्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली. अकोलेकाटी गावातील भारत गवळी असं या कथित हल्ला झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिवसेना भवन फोडू म्हणणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा यु-टर्न! दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास भारत गवळी हे एका शेतकऱ्याच्या शेतात काम करीत होते. त्यादरम्यान या बिबट्याने भारत गवळी यांच्यावर हल्ला केला. मात्र, आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पलायन केल्याची आपबिती या शेतमजूर असलेल्या भारत गवळी यांनी सांगितली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी सोलापूर वनविभागाची टीम पोहोचली आणि त्यांनी हल्ल्याबाबत माहिती घेतली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतमजूराकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि त्याचा बनाव उघड झाला. शेतमजुराने असा रचला बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव शेतमजूर भारत गवळी यांनी आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा घटनाक्रम वनअधिकाऱ्यांना सांगितला आणि त्याने बनाव रचल्याचे उघड झाले. शेतमजूर गवळी यांच्या म्हणण्यानुसार, ते शेतात दुपारी काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने पाठिमागून हल्ला केला. तो हल्ला लक्षात आल्यानंतर त्याने त्या बिबट्याचे दोन्ही कान पकडून त्याला पुढे उलटा आपटला. त्यानंतर त्याच्या अंगावर गुडघा रुतवूत शेजारी असणाऱ्या कुऱ्हाडीने बिबट्याच्या समोरच्या पायावर घाव घातले. त्यानंतर मात्र बिबट्या जखमी झाला आणि लंगडत लंगडत पळून गेला. zika virus maharashtra : पुण्यात आढळलेल्या पहिल्या रुग्णाची माहिती आली समोर दरम्यान या घटनेत कोणतेही तथ्य नाही. शेतमजुराने सांगितलेली घटना निव्वळ खोटी आहे. कथित हल्ला झालेला शेतमजूर भारत गवळी याने दारुच्या नशेत आढळला आहे. त्यामुळे बिबट्याने हल्ला केल्याची घटना पुर्णतः खोटी असून अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. जयश्री पवार यांनी दिली.  शेतमजुराने बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव का रचला ? कथित हल्ला झालेले भारत गवळी हे माझ्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. मात्र, कामचुकारपणाच्या हेतूने त्यांनी सुट्टी मिळण्यासाठी ही खोटी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या घटनेत कोणतेही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया सुधाकर क्षीरसागर यांनी दिली. त्यामुळे स्वतःला हव्या असलेल्या सुट्टीसाठी शेतमजूर भारत गवळी यांनी मात्र वनविभागासह विविध खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र चांगलेच कामाला लावल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा लहानपणी ऐकलेल्या ‘’लांडगा आला रे आला’’च्या कथेप्रमाणे उद्या खरंच वाघ आला तर काय होईल याची केवळ कल्पनाच केलेली बरी.. बिबट्याच्या घटनेत तथ्य आहे का ? सोलापूर शहरालगत असलेल्या कोंडी गावात तीन दिवसांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याचे ठसे आढळून आले होते. मात्र ते ठसे बिबट्याचे आहेत की तरसाचे याबाबत वनविभागाने दुजोरा दिला नव्हता. मात्र गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोंडीतील एका खासगी गोडाऊनच्या सीसीटीव्हीतही बिबट्यासदृश प्राणी कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कोंडी गावात कामासाठी वास्तव्यास असलेले कामगार तानाजी पवार यांनी बिबट्याला पाहिल्याचा दावा केला आहे. पहाटे 5:30 ते 6 च्या दरम्यान कामावर जात असताना आपल्या मागून बिबट्या गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तानाजी पवार यांनी आपल्या मागोमाग येणाऱ्या कामगारांना थांबवून पुढे न जाण्यास सांगितले. एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे प्रोफेसर पदासाठी नोकरीची संधी त्याचबरोबर तानाजी पवार यांनी जवळच्या एका गोडाऊनच्या मॅनेजरलाही पाहिलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला का हे पाहण्याची विनंती केली. तसेच सदर प्रकाराची माहिती मिळताच वन विभागाचे पथक कोंडी येथे दाखल झाले. त्यांनीही सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्या सीसीटीव्हीत बिबट्यासदृश प्राणी असल्याचे आढळून आले. दरम्यान वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सर्कच्या सदस्यांनी या परिसराचे निरीक्षण केल्यानंतर तिथे बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे ताजे ठसे आढळून आले होते. मात्र, हे ठसे तपासणीसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले असू ते ठसे बिबट्याचे आहेती की आणखी कोणत्या प्रण्याचे याबाबत अद्याप अहवाल आला नसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे वन विभागाकडून कोंडी गावाच्या शिवारात चार ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. या भागात वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक शुभांगी कोरे, यशोधरा आदलिंगे, अनिता शिंदे, वनरक्षक बापू भुई,  जवळगी,  कुर्ले आदी कर्मचाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी कोंडी परिसराची पाहणी केली. त्याचबरोबर बिबट्यापासून आपला बचाव कसा करावा याबाबत जनजागृतीही केली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Fake news, Leopard, Viral video., बिबट्या

पुढील बातम्या