जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापूरमध्ये धक्कादायक घटना, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

सोलापूरमध्ये धक्कादायक घटना, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

सोलापूरमध्ये धक्कादायक घटना, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

अश्विनी ग्रामीण रुग्णालयात सोमवारी 25 मे रोजी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 26 मे : सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत  चालली आहे. सोलापुरातील कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात कोरोना वार्डात एका जणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील  कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात  सोमवारी 25 मे रोजी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.  या मृतदेहाचा वासही येत असल्याची तक्रार अश्विनी रुग्णालयातील इतर कोरोनाबाधित रुग्णांनी केली आहे.   हेही वाचा - एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हँड सॅनिटायझर व्हायरसचा नाश करू शकतो? अश्विनी ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष वार्ड तयार करण्यात आला आहे.  याठिकाणी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी अश्विनी रुग्णालयात पोहोचले तेव्हा रुग्णांची गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आलं. हेही वाचा -  लॉकडाऊनमध्ये झाला जुळ्या मुलांचा जन्म, आईने अशी ठेवली कोरोनावरून नावं ज्या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात आलेय त्याठिकाणी त्यांना दिवस-दिवसभर पाणी मिळत नसल्याची तक्रार तेथील रुग्णांनी  केली आहे.  तसंच अद्याप एकाही डॉक्टराने आमच्याकडे भेट दिली नसून केवळ रोज सकाळी एक परिचारिका येते आणि गोळ्या देवून निघून जाते. त्यानंतर दिवसभर कोणीही येत नसल्याची तक्रार या रुग्णांनी केली आहे. दरम्यान, सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच मृतांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आतापर्यंत सोलापुरात कोरोनाचे एकूण 621 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर आत्तापर्यंत 59 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात