एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हँड सॅनिटायझर व्हायरसचा नाश करू शकतो?

एक्सपायरी डेट संपल्यानंतरही हँड सॅनिटायझर व्हायरसचा नाश करू शकतो?

एक्सपायरी डेटनंतरही Hand sanitizer तितकंच प्रभावी राहतं का?, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ ठेवणं हा एक मार्ग. घरात असताना साबणानं हात धुता येतात मात्र घराबाहेर ते शक्य होत नाही. अशा वेळी हँड सॅनिटायझर (hand sanitizer) उपयुक्त ठरतं. कोरोनाव्हायरसच्या या परिस्थितीत हँड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. मात्र प्रत्येक वस्तूची एक एक्सपायरी डेट (expiry date) असते, त्यानंतर त्या वस्तूचा वापर शक्यतो करू नये. हँड सॅनिटायझरच्या बाबतीतही हे लागू होतं आहे. एक्सपायर झालेलं हँड सॅनिटायझर वापरल्यानं काय होतं? एक्सपायरी डेटनंतरही हँड सॅनिटायझर तितकंच प्रभावी राहतं का?

हँड सॅनिटायझरमध्ये 60 ते 95 टक्के अल्कोहोल असल्यानं हँड सॅनिटायझर प्रभावी असतात. तेव्हाच ते जर्म्स आणि कोरोनासारख्या व्हायरसचा नाश करू शकतात. मात्र अल्कोहोलचं प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा कमी झालं तर ते व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतात म्हणजे त्यांची वाढ होणार नाही, मात्र त्यांचा नाश करू शकत नाहीत.

हे वाचा - 6 फूट सोशल डिस्टन्सिंग नाही पुरेसं; तब्बल 18 फुटांपर्यंत जाऊ शकतो Coronavirus

हँड सॅनिटायझर वारंवार खोलल्याने त्यातील अल्कोहोल हळूहळू उडून जातो आणि काही कालावधीनंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. अल्कोहोल 60 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास ते प्रभावी ठरत नाही.

हँड सॅनिटायझरच्या बाटलीवर उत्पादक जी एक्सपायरी डेट ती अल्कोहोलचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा कमी होते तेव्हाची असते आणि सॅनिटायझरची बाटली उघडल्यानंतर त्याचा हवेशी संपर्क आल्यानंतर त्यातील अल्कोहोलची मात्रा कमी होते. त्यामुळे जर तुम्ही सॅनिटायझरची बाटली उघडली नसेल तर ती लवकर एक्सपायर होणार नाही. म्हणजे तुम्ही एक्सपायरी डेटनंतरही ती वापरू शकता. एक सौम्य डिसइन्फेक्टेन्ट म्हणून तुम्ही ते वापरू शकता.

हे वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

First published: May 26, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading