मेरठ, 26 मे : एकीकडे कोरोनाचं संकट वाढत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनचा कालावधी. यातही चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळं लोकांचं जीवन सुरळीत होत आहे. अशातच मेरठमध्ये एका महिलेनं जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र सध्या ही बाळं चर्चेत आहेत ती त्यांच्या नावांमुळे. या महिलेनं आपल्या मुलांची नावं क्वारंटाइन (Quarantine) आणि सॅनिटायजर (Sanitizer) अशी ठेवली आहेत. त्यामुळे मेरठच्या मोदीपुरम भागातील पाबरसा इथं राहणारे वेणू आणि धर्मेंद्र दाम्पत्यांची ही लेकरं चर्चेचा विषय ठरली आहेत. क्वारंटाइन आणि सॅनिटायजर झाले जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग या जुळ्या मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे की, क्वारंटाइन आणि सॅनिटायजर त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. या दोन्ही गोष्टी आपली सुरक्षा करतात. म्हणून ही सुरक्षिततेची भावना आयुष्यभर कायम रहावी यासाठी त्यांनी आपल्या मुलांचे नाव क्वारंटाइन आणि सॅनिटायजर ठेवले आहे. वेणू यांनी सांगितले की प्रसूती दरम्यान त्यांना बर्यााच समस्यांचा सामना करावा लागला. त्यांची कोव्हिड चाचणीही करण्यात आली होती. अशीही वेळ होती जेव्हा कोणतेही डॉक्टर त्यांची प्रसूती करण्यास तयार नव्हते तेव्हा डॉ. प्रतिमा तोमर यांनी साथ दिली. त्यामुळं त्यांची सुरक्षित प्रसुती झाली. यादरम्यान त्यांनी आपल्या मुलानी नावं क्वारंटाइन आणि सॅनिटायजर ठेवण्याचा निश्चय केला. वाचा- सरकारी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह याआधी जुळ्या मुलांचे नाव ठेवलं होतं कोरोना आणि कोव्हिड एकीकडे कोरोनामुळं साऱ्या जगात चिंतेचे वातावरण असताना विनय वर्मा यांच्या घरात मात्र आनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. या मुलांची आई प्रीती वर्मा यांनी, “संपूर्ण देश कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच रेल्वे बंद आहे. प्रत्येक व्यक्ती घरात कैद आहे. अशा परिस्थितीत 27 मार्चची रात्र माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. एकीकडे जिथे लोक कोरोनामुळे त्रस्त आहेत, दुसरीकडे आमच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाला”, असे सांगितले. म्हणूनच वर्मा दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव कोरोना आणि मुलाचे नाव कोव्हिड ठेवले आहे. वाचा- 75-80% रिकव्हरी रेट; महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोनावर भारी ‘नागपूर मॉडेल’ वाचा- कोरोनापेक्षा अज्ञात व्हायरसचा जगाला जास्त धोका, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.