जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / फोटो सेशनच्या नादात महिला तहसीलदाराकडूनच सोशल डिस्टंसिंगची 'ऐसी की तैसी'

फोटो सेशनच्या नादात महिला तहसीलदाराकडूनच सोशल डिस्टंसिंगची 'ऐसी की तैसी'

फोटो सेशनच्या नादात महिला तहसीलदाराकडूनच सोशल डिस्टंसिंगची 'ऐसी की तैसी'

कोरोनाचा संकट दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत असून हा संसर्ग रोखण्यासाठी आजघडीला तरी सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जालना, 10 एप्रिल: कोरोनाचा संकट दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत असून हा संसर्ग रोखण्यासाठी आजघडीला तरी सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय आहे. हा उपाय कसोशीने पाळण्यासाठी प्रशासनाकडून पोटतिडकीने आवाहन करण्यात येत आहे. प्रेमाची भाषा न समजणाऱ्यांना कायद्याचा बडगा उगारून त्याचे महत्त्व पटवून दिले जात असताना तहसीलदारासारख्या जबाबदार अधिकाऱ्याकडूनच बेजबाबदारपणे सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली केल्याचा संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात समोर आला आहे. हेही वाचा… बारामतीत युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला, गंभीर जखमी अवस्थेत विहिरीत फेकलं कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी संचारबंदी देखील करण्यात आली आहे. याकाळात कोणी उपाशी राहू नये, म्हणून शासनाकडून ठिकठिकाणी 5 रुपयांत शिवभोजन उपलब्ध करून दिला जात आहे. परतूरमध्ये बुधवारी अशाच एका शिवभोजन केंद्राचा तहसीलदार रूपा चित्रक यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील तहसीलदार मॅडमला फोटो सेशनचा मोह आवरला नाही. यावेळी फोटो सेशनच्या नादात त्यांना सोशल डिस्टसिंगचा देखील विसर पडला. हेही वाचा… जगात कोरोनाने घेतला 1 लाख लोकांचा बळी, फक्त 8 दिवसांत मृतांचा आकडा दुप्पट संचारबंदी, सोशल डिस्टसिंग, जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम या सर्वांची सरर्सपणे पायमल्ली करीत जवळजवळ 20 ते 25 लोकांची गर्दी घेऊन यावेळी फोटो सेशन करण्यात आले. एवढंच नाही तर या महाभागांनी सदर फोटो सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांकडे ही दिले. त्यामुळे आणखी संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी आता या तहसीलदारांवर काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात