मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Malegaon : मालेगावमध्ये दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात, 10 पोलिसांसह 2 नागरिक जखमी

Malegaon : मालेगावमध्ये दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणात, 10 पोलिसांसह 2 नागरिक जखमी

. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मालेगाव, 12 नोव्हेंबर :  त्रिपुरामध्ये (tripura violence) होत असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मालेगावमध्ये (malegaon band) बंद पुकारण्यात आला होता. पण, या बंदला हिंसक वळण मिळाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये  3 पोलीस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला होता.

व्यापारी,दुकानदार, नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे नेहमी गजबजून असलेल्या मालेगावात शुकशुकाट पसरला होता. मनमाडमध्ये देखील व्यवहार बंद ठेऊन हिंसाचाराचा निषेध केला. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे.

आदित्य चोप्राची ओटीटीवर एन्ट्रीची तयारी; करणार 500 कोटींची गुंतवणूक

पण, संध्याकाळी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यात. या घटनेमध्ये 3 पोलीस अधिकारी,7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मालेगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, रॅपिड ऍक्शन फोर्स आणि राज्य राखीव दलासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे. दगडफेक करून तोडफोड करणारे 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका, गृहमंत्र्यांचं आवाहन

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

आज राज्यात ठिकठिकाणी  आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

Gujrat : रस्त्याच्या कडेला नॉनव्हेजच्या दुकानांवर बंदी; खाणाऱ्यांवरही कारवाई?

तसंच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे. त्याचबरोबर, पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळण्याचे आणि राज्यामध्ये शांतता कशी राहील यादृष्टीने कार्यरत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

First published: