मराठी बातम्या /बातम्या /देश /Gujrat : रस्त्याच्या कडेला नॉनव्हेजच्या दुकानांवर बंदी; खाणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई

Gujrat : रस्त्याच्या कडेला नॉनव्हेजच्या दुकानांवर बंदी; खाणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई

दोन्ही पालिकांकडून सांगण्यात आलं आहे की, उघड्यावर नॉनव्हेज विक्रीसह याचं सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येईल.

दोन्ही पालिकांकडून सांगण्यात आलं आहे की, उघड्यावर नॉनव्हेज विक्रीसह याचं सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येईल.

दोन्ही पालिकांकडून सांगण्यात आलं आहे की, उघड्यावर नॉनव्हेज विक्रीसह याचं सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येईल.

गांधीनगर, 12 नोव्हेंबर : गुजरातमध्ये (Gujrat News) सुरुवातीला राजकोट म्युनिसिपल कॉर्पोरेशनने उघड्यावर नॉनव्हेज (Nonveg) वा अंडी विक्रीवर प्रतिबंध (Ban on non veg shops) आणले आहेत. त्यानंतर आता वडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशननेदेखील उघड्यावर नॉनव्हेज विक्रीवर प्रतिबंध आणले आहेत. दोन्ही पालिकांकडून सांगण्यात आलं आहे की, उघड्यावर नॉनव्हेज विक्रीसह याचं सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येईल.

दोन शहरांमध्ये नॉनव्हेज आणि अंड्यांच्या उघड्यावरील विक्रीवर प्रतिबंध लावल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. गुजरातचे कायदे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी उघड्यावर मांसाहारावर प्रतिबंध लावल्यानंतर सांगितलं की, स्ट्रीट फूडमुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होतो. त्यातून येणाऱ्या धुरामुळे डोळ्यात जळजळ होते. (Gujrat Ban on non veg shops along the road Eaters can also be prosecuted)

ते पुढे म्हणाले की, फूटपाथ पायी चालणाऱ्यांसाठी आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण केलं जात नाही. फूटपाथवर दुकान लावणं एक प्रकारे जमिनीवरील अतिक्रमण आहे. त्यामुळे व्हेज असो वा नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचा स्ट्रीट फूड तयार करणाऱ्यांमुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये.

हे ही वाचा-प्रचारासाठी पाण्यासारखा ओतला पैसा, BJP नं खर्च केलं कोट्यवधी रुपये

गुजरातचे कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी राजकोट आणि वडोदराचे महापौर यांना या आदेशासाठी कौतुक केलं आहे. वडोदरामध्ये अद्याप लिखित आदेश देण्यात आलेला नाही, तर हा मौखिक आदेश आहे.

First published:
top videos

    Tags: Gujrat, Vegetable