..तर घरात बोभाटा करीन; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं 15 वर्षीय दीराला केलं मजबूर

साताऱ्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला तिच्या वहिनीनं शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

साताऱ्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला तिच्या वहिनीनं शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
किरण मोहिते,(प्रतिनिधी) सातारा,12 मार्च:साताऱ्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला तिच्या वहिनीनं शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका विवाहित महिलेनेवर आपल्या मावस दीरावर अत्याचार केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? पीडित 15 वर्षीय मुलगा आपल्या मावशीच्या गावाला यात्रेसाठी आला होता. यात्रेत आरोपी महिलेने पीडित मुलाला जाणून-बुजून धक्‍का मारला. याच कारणावरून आरोपी महिलेने पीडित मुलगा घरी ल्यानंतर 'भावजी, तुम्ही मला जाणून-बुजून धक्‍का मारला. मी तुमच्या दादाला सांगते,' असं सांगत त्याला दमदाटी केली. एवढंच नाही तर घाबरलेल्या मुलाला बळजबरी करत तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. शरीरसंबंध ठेवल्यानंतर याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, अशी धमकी देखील आरोपी महिलेने पीडित मुलाला दिली. हेही वाचा..मुंबईत व्यापारी पतीने तीन मित्रांना दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची मुभा काही दिवसानंतर पुन्हा आरोपी महिलेने पीडित मुलाला ब्लॅकमेल करत शरीरसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं. या प्रकारामुळे मुलगा आणखी घाबरला. मुलगा कोणाशी काहीच बोलत नसल्याने त्याला त्याच्या मावशीने बोलतं केलं. त्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार पीडित मुलाने आपल्या मावशीला सांगितला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून मावशीने मुलाला सोबत घेतले आणि शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. अल्पवयीन मुलाला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. हेही वाचा..बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..
First published: