मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईत व्यापारी पतीने तीन मित्रांना दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची मुभा

मुंबईत व्यापारी पतीने तीन मित्रांना दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची मुभा

 मुंबईतील एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला 'वाईफ स्वॅपिंग'च्या (पत्नीची अदलाबदली) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे

मुंबईतील एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला 'वाईफ स्वॅपिंग'च्या (पत्नीची अदलाबदली) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे

मुंबईतील एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला 'वाईफ स्वॅपिंग'च्या (पत्नीची अदलाबदली) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे

मुंबई,11 मार्च: मुंबईतील एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला 'वाईफ स्वॅपिंग'च्या (पत्नीची अदलाबदली) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नराधम व्यापाऱ्याने त्याच्या 39 वर्षीय पत्नीला तीन मित्रांच्या हवाले केलं होतं. एवढेच नाही तर पत्नीचं शरीरसुख घेण्याचीही आपल्या मित्रांना मुभी देखील दिली होती. नराधम पती सध्या तुरुंगात आहे. आरोपीला अटक होऊन आता तीन महिने उलटले तरी सेशन कोर्टाने आरोपी पतीला जामीन दिलेला नाही.

नराधम पती आपला नाद पूर्ण करण्यासाठी पत्नीचा वापर करत होता. तिला वारंवार वासनेची शिकार बनवत होता. तिची अब्रु मित्रांच्या ताब्यात देत होता. समजात अशी वागणूक कोणताही पती आपल्या पत्नीला देत नाही. असं सांगत कोर्टाने नराधमाचा जामीन फेटाळला. पतीने पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवत होता. त्यावरुन पत्नीला ब्लकमेल करून इतर दोन मित्रांसोबत शरीर संबंध प्रस्तापित करायला सांगितलं होतं. नंतर पतीने पत्नीवर लैंगिक अत्याचार केले होते.

हेही वाचा..बेडरूममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती मुलगी, आईला येताना पाहाताच तिनं केलं असं..

.. आणि पोलिसांनी प्रकरण दाबलं

ही घटना 2017 मध्ये घडली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पीडित महिलेची मानसिक स्थिती ठिक नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. बचाव पक्षाच्या वकीलाने कोर्टात पीडित महिलेवर नको ते आरोप केले. महिलेच्या चारित्र्यावरही संशय घेतला. मात्र, कोर्टाने पीडितेची बाजू ऐकून आरोपीचा जामीन फेटाळला. दुसरीकडे, या प्रकरणी पोलिसांनी या खटल्यातील दोन फरार आरोपींनीही जेरबंद केलं आहे.

हेही वाचा..छोट्या मित्रांनीच केला घात, कारमध्येच 51 वर्षीय मित्राचा आवळला बेल्टने गळा आणि...

First published:
top videos