मुंबई,8 मार्च: बेडरूममध्ये आपली मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत असल्याची माहिती आईला लागली होती. आई तडकाफडकी घरी पोहोचली. आई आल्याचं पाहाताच मुलगी घाबरली. तिने पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूमच्या खिडकीतून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. यात मुलीच्या डावा पाय फ्रेक्चर झाला आहे. यावेळी मुलीचा बॉयफ्रेंड घरात होता. मुंबईतील कुर्ला येथील बेल बाजारात शुक्रवारी (7 मार्च) दुपारी ही घटना घडली आहे. आता हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलं आहे.
हेही वाचा..'भावाच्या अतृप्त आत्म्याने चिरला भावाचा गळा', मृतकाच्या शेजारणीचा दावा
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, 17 वर्षीय मुलगी शुक्रवारी दुपारी बेडरूममध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती. याबाबत तिच्या आईला माहिती मिळाली. आई आल्याचे पाहाताच मुलगी घाबरली. तिचे बॉयफ्रेंडला पळून जाण्यास सांगितलं. परंतु, त्याने विलंब केल्याने तिनेच पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूमच्या खिडकीतून उडी मारली. या घटनेत मुलीचा डावा पाय मोडला आहे. तिच्यावर हॉस्पिटल उपचार सुरु आहेत. बेडरुममध्ये बॉयफ्रेंडसोबत होती, असं मुलीने तिच्या आई-वडिलांसमोर कबूल केलं आहे.
हेही वाचा..शुभमंगल सावधान...महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याने 61 व्या वर्षी घेतला लग्न करण्याचा निर्णय
बॉयफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल..
वीबी नगर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी बाल लैंगिक संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) मुलीच्या बॉयफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि घरात विनापरवागी केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका 24 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहिता रस्त्यावर उभी असताना तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने स्वीप्ट कारमध्ये बसवून तिला नशेचे औषध दिलं आणि शेगाव रोडवरील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.