पंढरपूर, 25 जानेवारी : यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत झालेल्या सिंकदरमुळे चर्चेत राहिली. पण सिकंदरनेही अवघ्या काही दिवसात मातीत उतरून मीच सिकंदर असल्याचे दाखवून दिले आहे. हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे.
सिकंदर शेख हे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. केसरी स्पर्धेत अन्याय झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमी नाराज झाले होते. पण सिकंदर शेखने त्यांची नाराजी आता दूर केली आहे. पंढरपूरमध्ये धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भरविलेल्या भीमा केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सिकंदर शेखने बाजी मारली.
हरियाणाच्या भुपेंद्र अजानाळा चितपटकरून सिकंदर भीमा केसरीचा मानकरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदरवर अन्याय झाल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. पण, आज सिकंदरने मैदानात उतरून खणखणीत उत्तर दिलं आहे. त्याच्या विजयामुळे कुस्तीप्रेमी सुखावले आहे.
महाराष्ट्र केसरीत काय घडलं?
महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली. त्याने अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव केला. दरम्यान, या लढतीआधी महेंद्र आणि सिकंदर शेख यांच्यात झालेल्या कुस्तीची चर्चा जोरदार होत आहे. यात महेंद्र गायकवाडला दिलेल्या गुणांवरून पंचांसह आयोजकांवर आरोप केले होते. सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडकडून गुणांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्याआधी सिकंदर शेखने उपांत्य सामन्यात माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकला चीतपट करून माती विभागातून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
(Maharashtra Kesari: कोण आहे सिकंदर शेख? महाराष्ट्र केसरी हरला तरी होतेय पराभवाची चर्चा)
पुढच्या फेरीत महेंद्र गायकावडने ४ गुण मिळवले आणि ५-४ अशी आघाडी घेतली. मात्र यामध्ये महेंद्र गायकवाडने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. तो परफेक्ट नव्हता असं काहींचे म्हणणे असून त्यावरून वाद सुरू झाला. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जातोय.
(Wrestler Protest: बृजभूषण यांची न्यायालयात धाव, कुस्तीपट्टूंविरुद्ध दाखल केली याचिका)
महेंद्रने टांग मारली तेव्हा सिकंदर पाठीवर पडला का? किंवा त्याचा खांदा मैदानावर टेकला का? यासारखे प्रश्न कुस्ती शौकिन विचारत आहेत. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी जिंकला असला तरी सिकंदरच खरा महाराष्ट्र केसरी आहे अशा भावना कुस्तीप्रेमी व्यक्त करतायत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.