मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Wrestler Protest: बृजभूषण यांची न्यायालयात धाव, कुस्तीपट्टूंविरुद्ध दाखल केली याचिका

Wrestler Protest: बृजभूषण यांची न्यायालयात धाव, कुस्तीपट्टूंविरुद्ध दाखल केली याचिका

बृजभूषणा सिंह यांनी विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या पैलवानांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय.

बृजभूषणा सिंह यांनी विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या पैलवानांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय.

बृजभूषणा सिंह यांनी विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या पैलवानांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

दिल्ली, 23 जानेवारी : भारतीय कुस्ती महासंघात सुरू झालेल्या वादानंतर आता अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. देशातील दिग्गज पैलवानांविरोधात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. बृजभूषणा सिंह यांनी विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या पैलवानांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय. यात त्यांनी म्हटलं की, माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप हे ब्लॅकमेल करण्यासाठी आणि पैसे उकळायला केले गेले. याची चौकशी केली जात आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत बृजभूषम सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे.

बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप करताना अनेक पैलवानांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठं आंदोलन केलं होतं. पैलवानांच्या या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता. केंद्र सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर पैलवानांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले होते. यानंतर आता बृजभूषण यांनी दिग्गज पैलवानांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या आठवड्यात सुनावणी होऊ शकते.

हेही वाचा : 26 जानेवारीला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याचे आयोजन, एश्ले गार्डनर भडकली

बृजभूषण यांनी याचिकेत म्हटलं की, "विनेश फोगाट ही पहिल्या क्रमांकावर आहे जिने मी राजीनामा द्यावा म्हणून ब्लॅकमेल केलं. माध्यमांनी स्वत:ला लोकन्यायालय किंवा पब्लिक कोर्ट स्वरुपात बदललं आहे आणि न्यायालयाच्या प्रकरणात हस्तक्षेप सुरू केला आहे." या याचिकेत संगीता फोगाट, सुमन मलिक, अंशु मलिक आणि बजरंग पुनिया या पैलवानांचीही नावे आहेत.

पैलवानांवर बृजभूषण यांनी असा आरोप केला की, त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा चुकीचा वापर केला आणि कुस्ती संघाच्या प्रमुखांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना जाहीरपणे महिलांच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप करून बृजभूषण यांच्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला धक्का लावण्याचं काम केलंय.

क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपट्टूंच्या आंदोलनानंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. बृजभूषण सध्या ४ आठवड्यासाठी कुस्ती महासंघाच्या पदापासून दूर असतील. एक समिती बृजभूषण सिंह यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी करेल.

First published:

Tags: Wrestler