मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हृदयद्रावक! आजारी पत्नीच्या निधनाने बसला धक्का; मृतदेह घरी येण्याच्या आत पतीने केला भयावह शेवट

हृदयद्रावक! आजारी पत्नीच्या निधनाने बसला धक्का; मृतदेह घरी येण्याच्या आत पतीने केला भयावह शेवट

मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आजारी पत्नीचं निधन (sick wife died) झाल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट ( husband commits suicide) केला आहे.

मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आजारी पत्नीचं निधन (sick wife died) झाल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट ( husband commits suicide) केला आहे.

मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आजारी पत्नीचं निधन (sick wife died) झाल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट ( husband commits suicide) केला आहे.

  • Published by:  News18 Desk

जळगाव, 02 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आजारी पत्नीचं निधन (sick wife died) झाल्याची माहिती मिळताच एका व्यक्तीने आपल्या आयुष्याचा हृदयद्रावक शेवट ( husband commits suicide) केला आहे. पत्नीचा मृतदेह घरी पोहोचण्याच्या आत पतीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पती-पत्नीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी सायंकळी पाच वाजता संबंधित दाम्पत्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. अचानक आई वडिलांचं छत्र हरवल्याने 19 वर्षीय एकुलत्या एक मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अरुण खंडू सोनवणे (वय-47) आणि मीराबाई सोनवणे असं मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव असून ते नागसेननगर परिसरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी आहेत. मृत सोनवणे हे मूळचे धरणगाव तालुक्यातील लाडली येथील रहिवासी आहेत. पण ते सध्या जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्याला 19 वर्षांचा एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत आहे. दरम्यान मृत मीराबाई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या.

हेही वाचा-पत्नीस मारहाण करणाऱ्या शिक्षकाला कोर्टाचा दणका; सुनावला 6 महिन्यांचा कारावास

त्यांना डबल न्यूमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे जळगावातील रुग्णालयात बरेच दिवस त्यांच्यावर उपचार केले जात होते. पण त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नव्हता. त्यामुळे सोनवणे यांनी पत्नी मीराबाई यांना मुंबई याठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. याठिकाणी उपचार सुरू असताना, रविवारी रात्री मीराबाई यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई आजारी पत्नीचं निधन झाल्याची माहिती मिळताच धक्का सहन न झालेल्या सोनवणे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

हेही वाचा-पत्नीनं जगणं केलं मुश्कील; छळाला कंटाळून पुण्यातील तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

विशेष म्हणजे, आईचं निधन झाल्यानंतर मुलगा अनिकेत याची माहिती आपल्या काही नातेवाईकांना दिली. तसेच घरी वडील एकटेच असल्याने त्यांना धक्का बसेल म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना आईच्या मृत्यूची बातमी दिली नव्हती. सोमवारी दुपारी आईचा मृतदेह घरी आणल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थित वडिलांना याची माहिती द्यायचं ठरलं होतं. पण सोनवणे यांचा भाऊ सुनिल यांनी फोन करून मीराबाईच्या मृत्यूची माहिती दिली. पत्नीचं निधन झाल्याची माहिती मिळताच, सोनवणे यांनी आपल्या राहत्या घरी येऊन आत्महत्या केली आहे. पत्नीचा मृतदेह घरी येईपर्यंत सोनवणे यांनी स्वत:ला संपवलं होतं. ऐन दिवाळीत पती पत्नीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Husband suicide, Jalgaon