कोल्हापूर, 01 नोव्हेंबर: पत्नीला सतत मारहाण (teacher husband beat wife) करत तिच्याकडे पैशांची मागणी (Demand money) करणाऱ्या एका शिक्षकाला कोर्टाने चांगलीच अद्दल घडवली आहे. मागील सहा वर्षे सुनावणी झाल्यानंतर, विविध साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने संबंधित शिक्षकाला सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला (6 months imprisonment) आहे. तसेच पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल पालघर जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती एस. एस. गुन्हाने यांनी दिला आहे.
सुदर्शन प्रकाश पाटील असं संबंधित शिक्षा झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. दोषी शिक्षक कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील रहिवासी आहे. तर पीडित फिर्यादी महिला ही मूळची सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून त्या पालघर जिल्ह्यातील मनोर येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. पीडित शिक्षिकेनं पती सुदर्शन विरोधात 2015 साली मनोर याठिकाणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या सहा वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं.
हेही वाचा-पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन्
अखेर नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने दोषी आढळलेल्या शिक्षक पतीला सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावला आहे. तसेच 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राथमिक शाळेत शिक्षिका असणाऱ्या फिर्यादी महिलेला पती सुदर्शन पाटील याने 11 सप्टेंबर 2015 रोजी बेदम मारहाण केली होता. आरोपीनं ठोशा-बुक्क्यांनी आणि लाकडी लाटण्याने मारहाण केली होती.
हेही वाचा-दिव्याखालीच अंधार! जजवरच गंभीर आरोप; ऐकून उच्च न्यायालयही थक्क, केलं निलंबित
या बेदम मारहाणीत शिक्षिकेच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. बेशुद्धावस्थेत पडलेल्या शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. यानंतर पीडित शिक्षिकेनं मनोर पोलीस ठाण्यात पती शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर गेल्या सहा वर्षांपासून पालघर जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. संबंधित खटल्यात न्यायालयाने नऊ साक्षीदारांचा तपास केल्यानंतर हा निकाल सुनावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur