मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'चमकोगिरी टाळायला हवी', उज्ज्वल निकम यांचं नवाब मलिक Vs NCB वादावर परखड भाष्य

'चमकोगिरी टाळायला हवी', उज्ज्वल निकम यांचं नवाब मलिक Vs NCB वादावर परखड भाष्य

 'राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणावर काही मत व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे.

'राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणावर काही मत व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे.

'राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणावर काही मत व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे.

सांगली, 23 ऑक्टोबर :  'राज्य किंवा केंद्र सरकारमधील तपास यंत्रणांनी तपास करताना अतिशय संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदने किंवा सोशल मीडियातून प्रसिद्धी टाळायला हवी' अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (ujjwal nikam) यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबी (ncb) आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर परखड भाष्य केलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCB आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोपांची मालिका रंगली आहे. या वादावर पहिल्यांदाच उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

' राजकीय नेत्यांनी आणि तपास यंत्रणा यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी करू नये. कोणीही पण निवेदन देणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायद्या व्यवस्थेला धोका आहे, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

T20 World Cup : 'कोणतीही टीम भारताला हरवू शकते', दिग्गजाने सांगितलं कारण

'राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणावर काही मत व्यक्त केली जात आहेत. तपास यंत्रणांनी तपास करताना संयम बाळगला पाहिजे. तर कोण्ही चमकोगिरी म्हणून वाटेल तशी निवेदन देणे टाळावी. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायद्या व्यवस्थेला धोका आहे. नेत्यांनी न्यायालयात दाद मागावी. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, हे योग्य नाही, असंही निकम म्हणाले.

अमरावतीत शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी Suicide note आली समोर

'गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य स्तुत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्याचं उज्वल निकम यांच्याकडून  कौतुक केले आहे. पण मनुष्यस्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्वाचा घटक न्यायालये असली पाहिजेत मात्र न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुखमंत्र्यांचा उदात्त हेतू आहे, असंही निकम म्हणाले.

First published: