अमरावती, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ (draught) यामुळे शेतीचे मोठे नकसान होत आहे. शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसत आहे. यामुळेच आर्थिक परिश्तिती हालाकीची असल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून हातात पिकच येत नसल्याने निराश झालेल्या बळीराजाच्या मुलीने आत्महत्या केल्याची (Farmer daughter suicide) घटना समोर आली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील 17 वर्षीय सेजलने आत्महत्या केली असून, मन सुन्न करणारी तिची सुसाईड नोट (Suicide Note) समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील छिंदवाडीत राहणारी 17 वर्षीय सेजल जाघव या तरुणीने टोकाचं पाऊल उचलंत आत्महत्या केली आहे. शेतात आई-बाबा कष्ट करतात मात्र, काहीही पिकत नाही. घर चालवण्यासाठी, शिक्षणासाठी कर्ज काढले आहे. शाळेत जाण्यासाठी कपडेही नाहीत. या सर्व परिस्थिती चिंताग्रस्त असलेल्या सेजलने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे.
वाचा :छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष, बीडमधील घटनेने महाराष्ट्र हादरलासेजलची सुसाईड नोट
आपल्या सुसाईड नोटमध्ये सेजलने म्हटलंय, 'मी आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे. माझ्या घरात एकूण सहा जण आहोत. आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्च आहे. आम्हाला राहण्यासाठई जागा थोडी आहे. एक लहान भाऊ आहे. कर्ज काढून आई आम्हाला शिकवते. आमच्या शेतात तीन वर्षे झाली खूप कमी उत्पन्न आले आहे. बाबाही खूप कष्ट करतात. मी कॉलेजमध्ये, बारावीत आहे. शिक्षणासाठी पैसे नाहीत. मी अनेक दिवसांपासून नैराश्येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मी आत्महत्या करत आहे.'
अवघ्या 17 वर्षीय सेजलने इतक्या टोकाचं पाऊल उचललं आहे. सेजलच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बळीराजांची काय स्थिती झाली आहे हे सुद्धा यातून स्पष्ट दिसत आहे. शेतातून उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी कर्ज काढतो आणि त्यात पाऊस झाला नाही तर नापिकी आणि अतिवृष्टी झाली तर पिके वाहून जातात या सर्वांत शेतकऱ्यांचेच नुकसान होते. त्यामुळे शेतातून उत्पन्न तर येतच नाही पण घेतलेल्या कर्जाची परतफेड मात्र व्याजासह करावी लागत असते. यंदाही राज्यातील विविध भागांत अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर कुणाच्या घरांचे नुकसान झाले आहे तर कुणाची गुरे वाहून गेल्याचं समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.