मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : 'कोणतीही टीम भारताला हरवू शकते', IND vs PAK सामन्याआधी दिग्गजाने सांगितलं कारण

T20 World Cup : 'कोणतीही टीम भारताला हरवू शकते', IND vs PAK सामन्याआधी दिग्गजाने सांगितलं कारण

Team India

Team India

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने करेल. 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल.

  • Published by:  Shreyas

दुबई, 23 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने करेल. 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरुवात होईल. या मॅचआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू नासिर हुसेनने (Naseer Hussain) टीम इंडियाला कोणतीही टीम हरवू शकते, कारण त्यांच्याकडे पर्यायी योजनेची कमतरता आहे, असं वक्तव्य केलं आहे. क्रिकेटचा सगळ्यात छोटा फॉरमॅट अनिश्चिततेने भरलेला आहे, त्यामुळे नॉक आऊटमध्ये कोणतीही टीम भारताला पराभूत करू शकते, अशी प्रतिक्रिया नासिर हुसेनने दिली. सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तसंच आयपीएलमुळे खेळाडूंना गरजेची असलेली मॅच प्रॅक्टिसही मिळाली.

स्काय क्रिकेटशी बोलताना नासिर हुसेनने टीम इंडिया विजयाची दावेदार असल्याचं सांगितलं, पण भारताला प्रबळ दावेदार मानायला आपण तयार नाही, असंही हुसेन म्हणाले. या फॉरमॅटमध्ये एका खेळाडूच्या 70-80 रनच्या खेळीने किंवा फक्त तीन बॉलमध्येच मॅचचा निकाल पलटू शकतो, त्यामुळे कोणत्याही नॉक आऊट मॅचमध्ये भारतासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असं वक्तव्य हुसेननी केलं. यासाठी त्यांनी आयसीसी ट्रॉफीमधल्या नॉक आऊट सामन्यांमध्ये भारताच्या खराब कामगिरीचं उदाहरण दिलं.

भारताने आपली अखेरची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. यानंतर भारतीय टीम 2015 वर्ल्ड कप, 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये बाहेर गेली. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाचं नॉक आऊटमधलं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. जेव्हा ते नॉक आऊट खेळतात, तेव्हा भारतीय प्रेक्षकांच्या अपेक्षांमुळे त्यांच्यावर दबाव वाढतो, असं हुसेन म्हणाले.

नॉक आऊट सामन्यामध्ये जर टॉप ऑर्डर अपयशी ठरली तर भारताकडे दुसरा पर्याय नसतो. भारतीय टीमकडे पर्यायी योजनेची कमतरता असते. तुम्ही असं मत हुसेन यांनी मांडलं. तुम्ही मागच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेला सामना पाहू शकता. अचानक ती मॅच कमी स्कोअरची होते आणि भारताकडे दुसरी कोणतीही योजना नसते, असं वक्तव्य हुसेन यांनी केलं.

न्यूझीलंडच्या चांगल्या टीमकडून भारताचा पराभव होतो. भारतासाठी एक समस्या म्हणजे त्यांची टॉप ऑर्डरही आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीसारखे बॅट्समन असल्यामुळे त्यांच्या मधल्या फळीला फार खेळण्याची संधी मिळत नाही. नॉक आऊट सामन्यांमध्ये जर टॉप ऑर्डर अपयशी ठरली तर मधली फळी अडचणीत येते, असं हुसेन यांनी सांगितलं.

First published:

Tags: India vs Pakistan, T20 world cup