मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाच्या धास्तीनं रक्ताच्या नातेवाईकांनीच स्वीकारलं नाही रुग्णाचं पार्थिव, अखेर....

कोरोनाच्या धास्तीनं रक्ताच्या नातेवाईकांनीच स्वीकारलं नाही रुग्णाचं पार्थिव, अखेर....

कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

बुलडाणा, 14 सप्टेंबर: राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांमध्ये कोरोनाबाबत मोठी दहशत पसरली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा..प्रेमीयुगुलाचा भयानक अंत! जन्मदात्यानं उद्ध्वस्त केला लेकी लेकीचा संसार

अशीच एक घटना सोमवारी बुलडाण्यात घडली. कोरोनामुळे एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी अक्षरश: मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अखेर बुलडाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अझहर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत मृत रुग्णाच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले.

संपूर्ण देशात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात देखील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील 64 वर पोहोचले आहे. डोनगाव येथील एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अझहर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नगरपरिषदे कर्मचाऱ्यांच्या सोबत जाऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मोहम्मद अझहर यांनी हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून सामाजिक एकतेचे दर्शन घडवलं आहे.

देशावर आजपर्यंत अनेकदा साथीच्या आजारांचं संकट आलं आहे. मात्र, या कोरोनामुळे तर रक्ताच्या नात्यांचे लोक देखील पार्थिव स्वीकारण्यास घाबरत असल्याने माणुसकी लोप पावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मोहम्मद अझहर यांनी सांगितलं.

ग्रामीण भागात पसरतोय कोरोना!

दरम्यान, कोरोना व्हायरस केवळ पुणे-मुंबईतच नाही तर ग्रामीण भागात पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा दुसरा टप्पा आणखी भीषण असू शकतो असं चित्र सध्या राज्यात दिसत आहे. सीरो सर्व्हेचा (Sero Survey) पहिला अहवाल पाहूनच धडकी भरली आहे. आता दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे, मात्र हा दुसरा अहवाल किती भीषण असू शकतो याचं चित्र महाराष्ट्रातील आकडेवारीवरूनच समोर येतं आहे.

इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्व्हे (Sero Survey)अहवाल जारी केला आणि या अहवालामुळे धक्काच बसला. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 64 लाख लोकांना कोरोना संक्रमण झाल्याचं समोर आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग पसरल्याचं सेरो सर्व्हेमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचा...ही छोटीसी चूक पडू शकते खूप महागात, नजर ठेवायला येत आहे BMCचे 'स्पेशल 15'

सिरो सर्व्हेचा पहिला अहवाल जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या अहवालाकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही आकडेवारी समोर येईल. मात्र त्याआधीच वास्तव रूप महाराष्ट्रात दिसू लागलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. 12 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. फक्त मुंबई, पुण्यातच नाही तर आता ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus