मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Virar Crime : धक्कादायक! प्रवासाचे भाडे मागणाऱ्या रिक्षाचालकावरच प्राणघातक हल्ला

Virar Crime : धक्कादायक! प्रवासाचे भाडे मागणाऱ्या रिक्षाचालकावरच प्राणघातक हल्ला

विरारमध्ये रिक्षा भाडे मागणाऱ्या एका रिक्षा चालकावर गर्दुल्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Virar Crime)

विरारमध्ये रिक्षा भाडे मागणाऱ्या एका रिक्षा चालकावर गर्दुल्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Virar Crime)

विरारमध्ये रिक्षा भाडे मागणाऱ्या एका रिक्षा चालकावर गर्दुल्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Virar Crime)

मुंबई, 21 ऑगस्ट : विरारमध्ये रिक्षा भाडे मागणाऱ्या एका रिक्षा चालकावर गर्दुल्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Virar Crime) रिक्षा चालक शेहजाद कासार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्यावर नालासोपाऱ्याच्या रिद्धीविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालक शेहजाद हा नेहमीप्रमाणे रिक्षा चालवीत असताना त्याला एकाने विरारच्या चंदनसार रोडवर सोडायला सांगितले होते. यावेळी रिक्षा पंक्चर असताना देखील रिक्षा चालकाने त्याला सांगितलेल्या जागेवर सोडले मात्र ज्यावेळी त्याने रिक्षाचे भाडे मागितले.

त्यावेळी त्या प्रवाशाने पैसे देण्यात नकार देत रिक्षा चालकाच्या तोंडावर ब्लेडने जीवघेणा हल्ला केला व घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात रिक्षा चालकाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षा चालकाने दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी  गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

हे ही वाचा : Swine Flu case in Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक, 15 दिवसांत 14 जणांचा मृत्यू

विरारमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

विरारमध्ये राहणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या दोन मित्रांनी मंगळवारी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर एकाने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. विरार पोलिसांनी बुधवारी पीडितेच्या मैत्रिणीसह चौघांवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही तिचा मोबाईल खराब झाल्याने मोबाईल रिपेअर करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली. मैत्रिणीने तिला फिरायला जाऊ असे बोलून एका झोपडपट्टीच्या मागील सार्वजनिक ठिकाणी घेऊन गेली. मैत्रिणीने तिच्या तीन मित्रांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. तिघे जण त्या ठिकाणी आल्यावर मैत्रिणीने पीडितेला एकाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, नाही तर तो बदनामी करेल अशी धमकी दिली.

हे ही वाचा : पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली बसले पण वीज काळ बनून आली, बुलडाण्यात दोघांचा मृत्यू

दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. तर आणखी एकांनं तिच्यासोबत अश्लिल कृत्य केलं. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

First published:

Tags: Mumbai News, Vasai virar, Virar, Virar crime