मुंबई, 21 ऑगस्ट : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता मुंबई (mumbai) आणि ठाण्यावर स्वाइन फ्लूचं संकट ओढावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या (swine flu) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हो आहे. मुंबईमध्ये 138 रुग्ण वाढले आहे. तर ठाण्यात तब्बल 400 रुग्णांची वाढ झाली आहे. मागील 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या होमग्राऊंड असलेल्या ठाण्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने विळखा घातला आहे. ठाण्यात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत 400 रुग्ण आढळून आले आहे. मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही 138 रुग्ण आढळून आले आहे. जुलै महिन्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होता ना दिसत आहे. ठाण्यात जुलैमध्ये 20 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. स्वाइन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. दोन्ही मृत महिला होत्या. ज्यांचं वय 72 आणि 51 वर्षे होतं. (Health Tips: अॅसिडिटी दूर करण्यासाठी करा हे 5 घरगुती उपाय; लगेच होईल परिणाम) या वर्षात स्वाइन फ्लूच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात जुलैपर्यंत एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे दोन आठवड्यांतच स्वाइन फ्लूने 7 बळी घेतले आहेत. 10 जुलैला पालघरमध्ये स्वाइन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी गेल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर आता एकूण 14 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबई, पुण्यात आहेत. त्यानंतर पालघर, नाशिक, कोल्हापूर, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नागपूर महापालिकेतही रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणं याची लक्षणं सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.