मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चिन्ह अन् नाव ठरलं, आता रॉयल्टीही द्यावी लागणार!, या बाळासाहेबांची शिंदेंकडे मागणी

चिन्ह अन् नाव ठरलं, आता रॉयल्टीही द्यावी लागणार!, या बाळासाहेबांची शिंदेंकडे मागणी


त्रिशुल जेव्हा धार्मिक निशाणी असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने ते नाकारलं. जर त्रिशुल धार्मिक निशाणी असेल तर ढाल तलवार सुद्धा

त्रिशुल जेव्हा धार्मिक निशाणी असल्याचे सांगून निवडणूक आयोगाने ते नाकारलं. जर त्रिशुल धार्मिक निशाणी असेल तर ढाल तलवार सुद्धा

शिवसेना कुणाची? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 ऑक्टोबर : शिवसेना कुणाची? यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे, तसंच दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरेंना धगधगती मशाल हे चिन्ह मिळालं आहे, तर शिंदेंना ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे.

बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नेमकी कुणाची शिवसेना? महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत, तसंच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही बाळासाहेब म्हणलं जातं. यावरून ठाकरे गटाकडून शिंदे गटाची खिल्ली उडवली गेली.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरातांची शिवसेना म्हणत असतील आणि माझा फोटो वापरणार असतील, तर त्यांना मला रॉयल्टी द्यावी लागेल, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

हेही वाचा काल संतापले अन् आज... 'परफेक्ट' निशाणी मिळाल्यानंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अंधेरीमध्ये पहिला सामना

नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिला सामना अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. उद्धव ठाकरेंनी या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तर भाजप-शिंदेंचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही, पण भाजपचे मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा  शिंदेना मिळालेली ढाल-तलवार कशाची 'निशाणी'? ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

First published:

Tags: Balasaheb thorat, Eknath Shinde, Shivsena