जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena Symbol : शिंदेना मिळालेली ढाल-तलवार कशाची 'निशाणी'? ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

Shivsena Symbol : शिंदेना मिळालेली ढाल-तलवार कशाची 'निशाणी'? ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

Shivsena Symbol : शिंदेना मिळालेली ढाल-तलवार कशाची 'निशाणी'? ठाकरेंच्या शिलेदाराचा घणाघात

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे, यावरून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 11 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहेत. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. तसंच दोन्ही गटांना वेगवेगळं नाव दिलं आहे. शिवसेना कुणाची हा निर्णय होत नाही, तोपर्यंत दोघांनाही शिवसेना हे नाव वापरण्यात येणार नाही. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल आणि दोन तलवारी हे चिन्ह मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल ही निशाणी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या शिंदेंच्या गटाला ढाल-तलवार मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंना मिळालेल्या या चिन्हावर टीका केली आहे. त्यांना मिळालेली ढाल ही भाजपची आहे तर तलवार ही गद्दारीची असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. हेही वाचा  काल संतापले अन् आज… ‘परफेक्ट’ निशाणी मिळाल्यानंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे? ‘ज्यांनी मेहबूबा मुफ्तीसोबत युती केली त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हे हिंदुत्ववादी नाहीत तर गद्दार आहेत. 100 दिवसांमध्ये 400 च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शिवसैनिक मशाल घेऊन क्रांतीची सुरूवात करणार आहेत,’ असं अंबादास दानवे म्हणाले. आता हनुमान चालिसा कुठे गेली? जनता तुम्हाला निवडणुकीत हनुमान चालीसाच म्हणायला लावेल, अशी टीका अंबादास दानवे यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अंधेरीमध्ये पहिला सामना नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिला सामना अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत होणार आहे. उद्धव ठाकरेंनी या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तर भाजप-शिंदेंचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही, पण भाजपचे मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना, मशाल आणि 1985! 28 वर्षांपूर्वी काय घडलं होतं? भुजबळांनी इतिहास जागवला!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात