• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सावरकर पोस्टवरून संजय राऊत यांनी नितीन राऊतांना फटकारले, म्हणाले...

सावरकर पोस्टवरून संजय राऊत यांनी नितीन राऊतांना फटकारले, म्हणाले...

'माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे'

'माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे'

'माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे'

 • Share this:
  नाशिक, 22 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी विनायक सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टबद्दल भाजपने राज्यभरात आंदोलनं पुकारले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही फटकारून काढले आहे. 'वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तर सूर्याचं तेजचं त्याला जाळून टाकेल' अशा शब्दांत संजय राऊत (sanjay raut) यांनी नितीन राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते संजय राऊत यांच नाशिकच्या घोटी येथील पक्ष कार्यलयाच्या उद्घघाटन कार्यक्रमाच्या आले होते. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सावरकर वादावर आपली रोखठोक भूमिका मांडली. 'माकड हा आपला पूर्वज आहे. सावरकर, महात्मा गांधी, कोणीही असले. माकडाला आपण वंशज मानलचं पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तर सूर्याचं तेजचं त्याला जाळून टाकेल' अशा शब्दांत राऊत यांनी नितीन राऊत यांना फटकारून काढले. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स गेल्या असंख्य वर्षात सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते महानायक राहतील, या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा कायम प्रयत्न केला. सावरकरांचं देशातील स्वातंत्र लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरून कोणाला पुसता येणार नाही' असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं. तसंच, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित आहे. या मुद्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला.  'एकतर राज्यपाल राहतील नाही तर विजय करंजकर आमदार होतील. मला खात्री आहे की विजय करंजकरच आमदार होतील' असं सूचक विधान राऊत यांनी केलं. VIDEO - तिला ऐकू येत होता विचित्र आवाज आणि तीव्र खाज; कानात पाहताच डॉक्टरही शॉक उत्तर महाराष्ट्र प्रवेशद्वार घोटीत शिवसेनेचा आमदार असता तर बरं वाटलं असतं. मात्र यापुढे इथं शिवसेनेचा आमदार असेल. शिवसेनेच्या शाखेला आम्ही न्यायालय म्हणतो. घराघरातील भांडण शाखेत सोडवले जातात. विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली, असंही राऊत म्हणाले. नुसतं शिवसेना जय चे नारे देऊन चालणार नाही. भारत माता की जय म्हणने म्हणजे फक्त देश भक्ती नाही. नुसत्या घोषणा देणाऱ्यांना बलिदान माहीत आहे का, शिवसेनेनं कायम बलिदान दिले आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला. 'मी आजही शाखेत जातो कामकाज बघतो. संध्याकाळ झाली की आमची पावलं शाखेकडे वळता तिथे गर्दी करायला आवडत. शिवसेना महाराष्ट्रची आई आहे माझ्या सारख्या अनके लोकांना शिवसेनेन उभं केलं आणि त्याचा पाया शाखा आहे. प्रवेशद्वारावर भगवे झेंडे लावायला हवे गावच्या प्रवेशदारावर कमानी उभारा, महापालिका येतील जिल्हा परिषद येतील आपण तयारी करा' अशी सूचनाही राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केली.
  Published by:sachin Salve
  First published: