बीजिंग, 22 ऑक्टोबर : आपल्याला बऱ्याच वेळा कानात खाज (Itching) येते (Itching in Ear). कानात (Ear) मळ असावा असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कानात खाज येण्याची तशी बरीच कारणं आहेत (Cause of Itching in Ear). पण काही वेळा कानातील खाजेचं कारण हे गंभीर असू शकतो. चीनमधील (China) एका महिलेसोबत असंच घडलं. तिच्या कानात इतकी तीव्र खाज येत होती की तिला डॉक्टरांकडे जावं लागलं. तपासणी तिच्या कानात जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनीही धक्का बसला. हुनान प्रांतातील झुझोऊ शहरातील ही महिला कानातील खाजेने त्रस्त झाली होती. तिच्या कानात इतकी भयंकर खाज येऊ लागली ती कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे गेली. सुरुवातीला डॉक्टरांना तिच्या कानात इन्फेक्शन झालं असं वाटलं पण जेव्हा त्यांनी तपासणी केली तेव्हा ते शॉक झाले. तिच्या कानात कॅमेरा टाकून जेव्हा पाहण्यात आलं तेव्हा कानात चक्क एक कोळी (Spider) असल्याचं दिसलं. हा कोळी छोटासा नाही तर आठ पायांचा मोठा कोळी होता. त्याने तिच्या कानात जाळंही विणलं होतं. हे वाचा - OMG! महिलेच्या कानात घुसला खेकडा आणि…; VIDEO पाहून तुम्हीही हादराल मेट्रो यूके च्या रिपोर्टनुसार महिलेने सांगितलं की, कानात खाज येण्याच्या एक दिवस आधी ती बाहेर गेली होती. घरी परतल्यानंतर तिच्या कानात खाज येऊ लागली आणि ती वाढत गेली. तिलाही कानाचं इन्फेक्शन झालं असावं असंच वाटलं. डॉक्टरांनी तिच्या कानातील कोळी बाहेर काढला, त्यानंतर महिलेला आराम मिळाला. याआधीही चीनमधील महिलेच्या कानात सापडला होता कोळी कानात कोळी सापडण्याची चीनमधील ही पहिली घटना नाही. याआधीसुद्धा सिचुआनमध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळ्याने जाळं विणलं होतं. एप्रिल, 2020 मधील हे प्रकरण. कान दुखत असल्यानं आणि खाज येत असल्याची तक्रार घेऊन ही महिला डॉक्टरांकडे आली. कानातून आवाज येत असल्याचंही या महिलेनं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी त्या महिलेच्या कानात तपासणी केली. कानात एक जिवंत कोळी असल्याचं लक्षात आलं. डॉक्टरांनी केमिकलचे थेंब कानात काढून चिमट्यानं कोळ्याला बाहेर काढलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा - 6 महिन्यांपासून पोटात होता मोबाईल; युवकाला कल्पनाही नव्हती, एक्सरे पाहून डॉक्टरही शॉक हा कोळी एक आठवडा या महिलेच्या कानात होता. सुदैवाने इयरड्रमला या कोळ्यानं कोणतीही इजा पोहोचवली नाही. नाहीतर या महिलेला ऐकण्याची समस्या निर्माण झाली असती. त्यामुळे महिलेचा कान नीट आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.