शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. मी स्वत:च ईडी कार्यालयात हजर होतो, असं म्हणत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांना अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता.

दरम्यान, एकीकडे ईडी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली.

नंतर ते अज्ञातवासात गेले होते. मात्र आता अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. इथं शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, भाऊ श्रीनिवास पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले. मात्र आपण 3 किंवा 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या