मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोदी नाही तर शिवसेनेनं घेतला पुढाकार, 'हा' नेता करणार प्रयत्न

पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोदी नाही तर शिवसेनेनं घेतला पुढाकार, 'हा' नेता करणार प्रयत्न

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पुढं केलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पुढं केलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पुढं केलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 6 जानेवारी : महाराष्ट्रातील सत्ताबदलानंतर आता देशातील समीकरण बदलण्यासाठी शिवसेनेनं आपली ताकद पणाला लावण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पुढं केलं आहे. 'राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीत आकड्यांचं गणित आमच्या बाजूने असेल,' असा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रीय राजकारणात याआधी पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या प्रादेशिक मर्यादांमुळे शरद पवार यांना पंतप्रदान पदापर्यंत पोहचता आलं नाही. गेल्या काही वर्षांपासून शरद पवार यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे येताना दिसत आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची ऑफर असल्याचंही अनेकदा बोललं गेलं आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार यांनी काँग्रेससोबतच राहण्याच्या निर्णय घेतल्यानी ती चर्चा मागे पडली.

शरद पवारांपासून रितेश देशमुखपर्यंत...महाराष्ट्रातून JNU हल्ल्याचा जोरदार निषेध

एकीकडे भाजपबाबतची चर्चा मागे पडत असताना आता मात्र शिवसेनेनं शरद पवार यांना राष्ट्रपती निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना नेते संजय राऊत याबाबत बिगरभाजप सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये जाऊन विविध नेत्यांची भेट घेणार आहेत. 'याबाबत आधी पवारसाहेबांशी बोलून त्यांचं मत जाणून घेऊ. मात्र फार काही अडचण येईल असं वाटत नाही,' असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात सत्तांतर

महाराष्ट्रात भाजपला धक्का देत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. मात्र सत्तांतराच्या या नाट्यात केंद्रस्थानी होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. कारण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना एकत्र आणणं तसं नव्हतं. त्यातच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या सुरुवातीला शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक नव्हत्या.

मात्र शरद पवार यांनी समजूत काढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने शिवसेनेसोबत जाण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शरद पवारांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आता शिवसेना त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

First published:

Tags: NCP, Sharad pawar