जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena : 'एकदा नाव गेलं की...', शिवसेना शिंदेंची झाल्यावर राज ठाकरेंना आठवले बाळासाहेब, Video

Shivsena : 'एकदा नाव गेलं की...', शिवसेना शिंदेंची झाल्यावर राज ठाकरेंना आठवले बाळासाहेब, Video

Shivsena : 'एकदा नाव गेलं की...', शिवसेना शिंदेंची झाल्यावर राज ठाकरेंना आठवले बाळासाहेब, Video

Big Breaking Eknath Shinde Won Raj Thackeray reaction शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे, ज्याचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….’, असं कॅप्शन राज ठाकरे यांनी या ट्वीटला दिलं आहे. ‘नाव आणि पैसा. पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो… पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा, नाव मोठं करा.’ असा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला व्हिडिओ राज ठाकरेंनी शेअर केला आहे.

जाहिरात

‘अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांचा विचार आणि आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत एकरूप झालेले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘ही लोकशाहीची हत्या आहे. न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणा गुलाम झाल्या आहेत’, असा आरोप या निकालानंतर संजय राऊत यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात