जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दसरा मेळावा शिंदे आणि ठाकरे, परवानगीचा तो 'पुरावा' 'सुप्रीम' सुनावणीवेळी अडचणीचा? वाचा Inside Story

दसरा मेळावा शिंदे आणि ठाकरे, परवानगीचा तो 'पुरावा' 'सुप्रीम' सुनावणीवेळी अडचणीचा? वाचा Inside Story

दसरा मेळावा शिंदे आणि ठाकरे, परवानगीचा तो 'पुरावा' 'सुप्रीम' सुनावणीवेळी अडचणीचा? वाचा Inside Story

महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह असला तरी राजकीय पक्षांमध्ये दसरा मेळाव्यावरून (Dusara Melava) राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा (Shivsena) ऐतिहासिक दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून ठाकरे-शिंदे आमने-सामने आले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 सप्टेंबर : महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह असला तरी राजकीय पक्षांमध्ये दसरा मेळाव्यावरून (Dusara Melava) राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा (Shivsena) ऐतिहासिक दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून ठाकरे-शिंदे आमने-सामने आले आहेत. दसरा मेळाव्याबाबत पहिला अर्ज 22 ऑगस्टला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेकडे (BMC) देण्यात आला, तर दुसरा अर्ज गणेशोत्सवाच्या आधी शिंदे गटाकडून (CM Eknath Shinde) आला. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी दोघांकडून अर्ज आला आहे, पण याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया बीएमसीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी द्यायची, याबाबतचा निर्णय घेणं अधिकाऱ्यांनाही अडचणीचं ठरणार आहे, कारण याचा वापर सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी वापरला जाऊ शकतो. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर सायलेंट झोन असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ठराविक दिवस सभा, रॅली यांच्यासारखे कार्यक्रम घ्यायला परवानगी देण्यात आली, यामध्ये दसऱ्याचा दिवस शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आता बीएमसीकडून उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली, तर हा आम्हीच शिवसेना असल्याचा पुरावा म्हणून सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलं जाऊ शकतं. दसऱ्यालाच शिंदे सीमोल्लंघन करणार? शिवतिर्थावर राज ठाकरे प्रमुख पाहुणे! कार्यकाळ संपल्यामुळे मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे, तर प्रशासक हा नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतो. नगरविकास खातं हे सध्या मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे जे एकनाथ शिंदे शिवसेना आमचीच यासाठी लढत आहेत, त्यांच्याच खात्याने शिवसेना म्हणून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला परवानगी दिली, तर पुढे शिंदेंसाठीच ते अडचणीचं ठरू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात