जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / निंबाळकरांची निष्ठा उद्धव सेनेशी कायम! उद्धव ठाकरेंनी कौटुंबिक ट्रॅजेडीत दिली होती साथ, काय घडलं होतं नेमकं?

निंबाळकरांची निष्ठा उद्धव सेनेशी कायम! उद्धव ठाकरेंनी कौटुंबिक ट्रॅजेडीत दिली होती साथ, काय घडलं होतं नेमकं?

निंबाळकरांची निष्ठा उद्धव सेनेशी कायम! उद्धव ठाकरेंनी कौटुंबिक ट्रॅजेडीत दिली होती साथ, काय घडलं होतं नेमकं?

56 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेसमोर (Shivsena) पहिल्यांदाच एवढं मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवसेनेच्या या कठीण काळात आता फक्त काही ठराविक आमदार आणि बोटावर मोजण्याइतके खासदार मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. यातलेच एक म्हणजेच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar).

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै : 56 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिवसेनेसमोर (Shivsena) पहिल्यांदाच एवढं मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवसेनेला बंडाचा इतिहास नवा नसला तरी यावेळी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडामुळे शिवसेनेच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 55 पैकी शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत, तर खासदारांचीही अवस्था तशीच आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे. शिवसेनेच्या या कठीण काळात आता फक्त काही ठराविक आमदार आणि बोटावर मोजण्याइतके खासदार मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. यातलेच एक म्हणजेच उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar). विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढले तेव्हा उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी पद्मसिंह पाटील (Padmsingh Patil) यांचे पूत्र राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली, पण माझा संघर्ष त्यांनी बघितला, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राणा जगजितसिंह यांना उमेदवारी नाकारली, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. राणा जगजितसिंह भाजपमध्ये राणा जगजितसिंह पाटील हे 2019 विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले, त्यानंतर त्यांनी तुळजापूरमधून निवडणूकही जिंकली. उस्मानाबादचा संघर्ष उस्मानाबादमधला निंबाळकर आणि पाटील घराण्यामधला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. 2005 साली ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) यांची हत्या झाली. अलिबागजवळ पवनराजे निंबाळकर यांचा मृतदेह सापडला. या हत्येच्या आरोपाप्रकरणी पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. काही काळानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पवनराजे निंबाळकर हे एकेकाळी पद्मसिंह पाटलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते, पण उस्मानाबादमधल्या सहकारी संस्थांवरच्या ताब्यावरून वाद झाले. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांच्यातली राजकीय लढाईदेखील बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीत ओमराजेंचा त्यांचाच भाऊ राणा जगजितसिंह यांनी 88 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. तर त्याआधी 2009 साली ओमराजेंनी राणा जगजितसिंह यांचा 16 हजार मतांनी पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात