पुणे, 22 जुलै : पुण्यात सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने काल रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. परंतु त्या रुग्णाचा आज दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मनोज कुंभार असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला निमोनियाचा त्रास होत असल्याची नातेवाईकांनी सांगितलं. तो धायरी परिसरातील रहिवासी आहे. त्रास वाढल्याने नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. दुपारी एक वाजल्यापासून नातेवाईक रुग्णवाहिकेसह वेगवेगळ्या रुग्णालयात चकरा मारत होते. मात्र, अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर सुद्धा त्याला बेड उपलब्ध झालाच नाही आणि त्यामुळे अक्षरक्ष कंटाळलेल्या रुग्णांना अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं. रुग्णसह संतप्त नातेवाईकही अलका चौकात बसून होते. मात्र रात्री उशिरा विश्रांतवाडीच्या रूग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर नातेवाईकांची समजूत काढून त्यांना तात्काळ महापालिकेच्या रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. खरंतर. पुण्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशात रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. दरम्यान, Unlock नंतर पुण्यात Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. एक आठवड्याच्या कडक लॉकडाऊननंतही रुग्णवाढ कमी झालेली नाही. 21 जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 40715 झाली आहे. 24 तासांतच 1512 रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात 24 तासांत 30 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू नोंदला गेला. 616 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 99 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.