मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज ठाकरेंचा त्या गौप्यस्फोटातून उद्धव ठाकरेंनी काढली हवा, एका वाक्यात दिलं उत्तर

राज ठाकरेंचा त्या गौप्यस्फोटातून उद्धव ठाकरेंनी काढली हवा, एका वाक्यात दिलं उत्तर

file photo

file photo

काल झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च : शिवसेना सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र, माझ्यासमोर परिस्थिती अशी निर्माण झाली की मला निर्णय घ्यावा लागला. यासाठी घरातून कसं राजकारण झालं यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर काल मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत अनेक गौप्यस्फोट केले. यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गौप्यस्फोटातून हवा काढत एका वाक्यात उत्तर दिले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

गेल्या 18 वर्षापासून ते घासले, पुसलेले भाषण होते. मी माझी भूमिका मांडली आहे. एवढी वर्ष कारवाई होत नाही. आता होते. स्क्रिप्ट आली. त्यानुसार बोलले असणार आणि रातोरात कारवाई होते. राज्यात इतरही अनेक अनधिकृत गोष्टी आहेत त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पत्र द्यावे, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.

दरम्यान, यावेळी त्यांनी फडणवीसांसोबतच्या भेटीबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले की, पूर्वी खुलेपणा होता. पण हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरतात, असे दिसतेय. जर भविष्यात बंद दाराआड चर्चेचा विषय आला तर बघू, असेही ते म्हणाले. तसेच मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्यावर्षी भूमिपूजन केले. पण एक विटदेखील रचली गेली नाही, अशी टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Raj Thackeray Rally : शिवसेना-धनुष्यबाणाचा वाद सुरू होता तेव्हा... राज ठाकरे झाले इमोशनल

काल राज ठाकरे सभेत काय म्हणाले होते?

शिवसेना सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र, माझ्यासमोर परिस्थिती अशी निर्माण झाली की मला निर्णय घ्यावा लागला. यासाठी घरातून कसं राजकारण झालं यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झालं, कसं झालं याचा चिखल मला करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसं कधी मनात आलं नाही, कुणाला ते पेलणार नाही, ते झेपणार नाही

मला भिंतीकडे दाबण्याचा प्रयत्न झाला, माझे फोटो बॅनरवर छापले जात नव्हते. एकेदिवशी मी त्याला गाडी घेऊन बाहेर गेलो. हॉटेल ऑबेरायला गेलो, मी समोर बसवलं त्याला...हे मी जे सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतोय....बोल तुला काय हवं आहे, तुला पक्षाचं अध्यक्ष व्हायचं. उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर तो हो म्हणाल.. तुला जे व्हायचं ते हो, मला सांग माझं काम काय आहे, मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांना जबाबदारी द्यायची नाही. मग पुढच्या वेळी प्रचाराला कुठल्या तोंडाने जायचं, असे राज ठाकरे काल आपल्या सभेत म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Maharashtra politics, Raj Thackray, Uddhav Thackeray