Home /News /maharashtra /

नगरमध्ये राजकारणाला नवे वळण, शिवसेनेनं ऐनवेळी घेतली माघार; राष्ट्रवादीने मारली बाजी

नगरमध्ये राजकारणाला नवे वळण, शिवसेनेनं ऐनवेळी घेतली माघार; राष्ट्रवादीने मारली बाजी

    अहमदनगर, 25 सप्टेंबर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, स्थानिक पातळीवर निवडणुकीतही शिवसेनने मोठ्या मनाने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मदत करत पराभव स्वीकारला आहे.  अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. अहमदनगर महापालिकेची स्थायी सभापतीपदाची निवडणूक पार पडली आहे.  महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर विजय झाली.विशेष म्हणजे,  संख्याबळ जास्त असतानाही शिवसेना सत्तेपासून दूर राहावे लागले. सभापतीपदाची निवडणूक ही लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडली होती. अखेर 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज वितरण करून दाखल केले. त्यानंतर आज निवडणूक विशेष सभा पार पडली. अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी माघार घेतली. त्यामुळे मनोज कोतकर यांची निवड बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या निवडीनंतर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.   सभापतीपदाच्या निवडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र बसून राष्ट्रवादीचा उमेदवारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याप्रमाणे आम्हाला निरोप मिळाला, असं म्हणत जगताप यांनी आभार मानले आहे. पहिली स्थायी समिती जानेवारी 2019 मध्ये अस्तित्वात आली होती.  एक वर्ष पूर्ण झाल्यावर चिठ्ठ्या काढून 8 सदस्य 31 जानेवारी 2020 रोजी निवृत्त झाले. यामध्ये सेनेचे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3 तसेच काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यांच्या या रिक्त जागी अशाच पक्षीय सदस्य संख्येनुसार नवे सदस्य नियुक्त होणार होते. पण फेब्रुवारी महिन्यात प्रभाग ६ अ या जागेच्या पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्याने मनपातील पक्षीय बलाबल बदलले. आणि सेनेची एक जागा कमी झाली. सेनेकडे 24 पैकी 23 जागा राहिल्यात. तर भाजपची संख्या एकने वाढून 15 वर गेली. त्यामुळे स्थायी समितीत सेनेचे संख्याबळही एका जागेनं कमी झाली असून 5 वर आली आहे. तर भाजपची 3 जागेवरून  4 वर पोहोचली. अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या सभापतीच्या निवडीत शिवसेनेनं ऐनवेळी माघार घेतली आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: NCP, Shivsena, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना

    पुढील बातम्या